Viral Whirlwind Video: बापरे! नेदरलँडमध्ये एक दुर्मिळ चक्रीवादळ,व्हिडीओ वायरल! नागरिकांचं प्रचंड नुकसान

| Updated on: Jun 28, 2022 | 8:26 AM

घरांचे छप्पर फाटलेत, उडालेत. झाडं कारवर आदळली गेलीयेत. लोकांचं आर्थिक नुकसान बरंच झालंय. पहिल्यांदाच अशा प्रकारचं संकट आल्यानं यंत्रणेवर ताण आलाय.

Viral Whirlwind Video: बापरे! नेदरलँडमध्ये एक दुर्मिळ चक्रीवादळ,व्हिडीओ वायरल! नागरिकांचं प्रचंड नुकसान
नेदरलँडमध्ये एक दुर्मिळ चक्रीवादळ
Image Credit source: Twiiter
Follow us on

नेदरलँडमधील (Netherlands) एका शहराला चक्रीवादळाचा (Whirlwind) तडाखा बसलाय. तीन दशकात पहिल्यांदा अशा प्रकारचं चक्रीवादळ आलंय. हे चक्रीवादळ इतकं प्राणघातक होतं की यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू आणि 10 जण जखमी झालेत. या वादळाने सोमवारी नैऋत्य डच शहरात धुमाकूळ घातलाय. या वादळामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या झिअरिक्झी शहरात सगळं उध्वस्त झालंय. इथे गाड्यांचं, लोकांच्या घरांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. घरांचे छप्पर फाटलेत, उडालेत. झाडं कारवर आदळली गेलीयेत. लोकांचं आर्थिक नुकसान बरंच झालंय. पहिल्यांदाच अशा प्रकारचं संकट आल्यानं यंत्रणेवर ताण आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेली महिला 73 वर्षीय पर्यटक (Tourist) होती. ती हेगजवळच्या वासनार या शहरातील होती. शहरातील हार्बर परिसरात वादळाने छत खाली कोसळलं आणि टाईल डोक्यात पडल्यानं तिच्या डोक्याला मार लागला आणि तिचा मृत्यू झाला.दरम्यान घटनास्थळी आपत्कालीन सेवांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले आणि इतर आठ जणांचे पॅरामेडिक्सने साइटवर उपचार केलेत.

झिअरिक्झी नावाच्या एका पर्यटनस्थळाचा हा व्हिडीओ

हा व्हिडीओ झिअरिक्झी नावाच्या एका पर्यटनस्थळाचा आहे. हे एक बेट आहे. पर्यटनाचा हंगाम चालू असतानाच या वादळाचा तडाखा बसलाय. या व्हिडीओमध्ये बघितल्यावर हे वादळ किती भयानक असेल याचा अंदाज येतो. सध्या हा व्हिडीओ प्रचंड वायरल होतोय. या बेटावर एक प्रसिद्ध ऐतिहासिक मासेमारीचं “फॅट टॉवर” बंदर आहे, झीलँड प्रांताचा समावेश आहे त्यामुळे इथे लोकांची प्रचंड गर्दी असते. लोकांनी हे वादळ प्रत्यक्ष अनुभवलंय. या वादळाचं वर्णन करताना लोकं सांगतात, “जसजसं वादळ जवळ येत होतं लोकं जोरात धावत होते. मी लोकांना इतक्या वेगाने धावताना कधीही पाहिले नाही. पूर्णपणे काळं दिसणारं हे भयानक वादळ आम्हाला कळायच्या आत 5 सेकंदात खाली आलं आणि सगळे छप्पर अक्षरशः उडून गेले. हे प्रचंड वादळ आम्हाला हवेमध्ये तरंगताना दिसले आणि मग आम्ही सर्वजण घाबरून आत गेलो आणि दारे बंद केली. सोशल मीडियावरील फूटेजमध्ये हवेत ढिगारा फिरत असल्याचे दिसून आले. इतर प्रतिमांमध्ये असे दिसून आले होते की वादळ स्वतःच जमिनीच्या दिशेने येतंय.

हे सुद्धा वाचा

नेदरलँडच्या सपाट लँडस्केपमुळे समुद्रसपाटीपासून अगदी वरच्या बाजूस हे चक्रीवादळ दिसतं. व्हिडीओमध्ये या वादळाचा अंदाज येतो कि ते किती भयानक असेल. केएनएमआयने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, “मुसळधार वादळे! ज्याला चक्रीवादळ देखील म्हटले जाते,हे आमच्या देशात दुर्मिळ आहेत.”