मुंबईः यहूदी धर्माचा वारसदार असल्याचे सांगत व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांचा जन्म युक्रेनमध्ये (Ukraine) 25 जानेवारी 1978 मध्ये झाला. त्याचे वडिल ऑलेक्झेंडर झेलेंस्की हे प्राध्यापक तर त्याची आई रायमा झेलेंस्की इंजिनीयर होत्या. त्यांचा मुलगा कधी काळी कॉमेडियन म्हणून जगासमोर आला आणि नंतर तोच विनोदवीर राष्ट्रध्यक्ष बनला, त्याचा हा प्रवास
रशियाकडून (Russia) चोवीस तास युक्रेनला आगीचे चटके देणाऱ्या रशियापुढे युक्रेनचा राष्ट्रध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्कीने यांनी आपली हार पत्करली नाही व त्यांच्या समोर त्याने वैयक्तिक गुडघेही टेकले नाहीत. रशियाकडून हल्ला झाल्यानंतर व्होलोडिमिर झेलेन्स्कीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले आहे की, आपल्या दुश्मानानी प्रथम मला लक्ष्य केले असून माझ्यानंतर त्यांचा डोळा माझ्या कुटुंबीयांवर आहे. व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणतात की, माझ्यात जीव असेपर्यंत मी लढत राहणार आहे. व्होलोडिमिर झेलेन्स्कीने आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून ते आपल्या देशवासियांबरोबर संवाद साधत आहेत.
व्होलोडिमिर झेलेन्स्की हे लॉमध्ये त्यांनी पदवी मिळवली आहे. यहूदी धर्माचा ते वारसा सांगतात, त्या झेलेन्स्की यांचा जन्म 25 जानेवारी 1978 मध्ये युक्रेनमध्ये झाला. सुशिक्षित घराण्यात तो वाढल्यामुळे तो शिक्षणातही हुशार होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला इज्रराईल देशाकडून त्याला शिष्यवृत्ती मिळाली, मात्र त्याच्या वडिलांनी त्याला तिकडे जाऊन शिक्षण घेण्यास नकार दिल्याने त्याने कीवमध्ये राहूनच आपली पदवी पूर्ण केली. कीव नॅशनल इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीमधून त्याने कायद्याची पदवी घेतली.
1997 मध्ये त्याने कलाकार असणाऱ्या मित्रांबरोबर ‘क्वार्टल 95’ ही कॉमेडी ग्रुप तयार केला, आणि त्याच्या या कॉमेडियन कार्यक्रमाला लोकांनीही उदंड प्रतिसाद दिला. 2003 मध्ये आपल्या विनोदी कार्यक्रमाचा प्रयोग सुरू करणाऱ्या झेलेन्स्कीने स्वतःचाच आदर्श समोर ठेवत त्याने राजकारणात आपले नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या स्वतःच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
झेलेन्स्कीने 2018 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, आणि त्या पक्षाचे नाव ठेवले Servant of the People’s Party. आणि या पक्षाच्या माध्यमातूनच त्यान राष्ट्रध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपले नाव घोषित केले. त्या घोषणेनंतर झालेल्या मतदानात त्यांना 73 टक्के मतदान पडले, आणि साऱ्या युक्रेनला त्याने धक्का दिला.
झेलेन्स्कीने राजकारणात प्रवेश करण्याआधी ओलेना वोलोडिमिरिव्हना झेलेन्स्कीबरोबर विवाहबद्ध झाला. ओलेना ही इंजिनीयर आणि पटकथा लेखिका आहे. हा त्यांचा पेशा असला तरी त्या दोघांना सामाजिक कार्यामुळे त्या देशात त्यांची वेगळी ओळख आहे. कोरोना काळात नागरिकांसाठी त्यांनी केलेली मदत युक्रेनमध्ये कुणीच विसरु शकत नाही. ओलेना ही सुद्धा तेथील राष्ट्रीय विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे, आणि ती स्थापत्य अभियांत्रिकीमधूनही पदवी घेतली आहे.
राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर आणि ओलेना झेलेन्स्कीला मुलगा आणि मुलगी आहे. त्यांच्या मुलाचे नाव किरिलो आणि मुलीचे नाव ऑलेक्जेंड्रा आहे. व्होलोडिमिर आणि त्याची पत्नी ओलेना ही इन्स्टाग्रामवर कायम आपल्या परिवाराचे फोटो शेअर करत असतात. सध्याच्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना भीती आहे की, व्होलोडिमिरनंतर रशिया आपल्या कुटुंबियाना ते त्रास देतील.
संबंधित बातम्या