जेरुसलेम : हमासने एकाचवेळी 5 हजार रॉकेट डागून इस्रायलवर हल्ला केला. यात 1400 पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. शेकडो जखमी झाले. हमासच्या दहशतवाद्यांनी काही इस्रायली नागरिकांना बंधक बनवलं व त्यांना सोबत गाझा पट्टीत घेऊन गेले. त्यानंतर इस्रायलने पलटवार केला. गाझा पट्टीवर सतत हवाई हल्ले सुरु आहेत. हमासचे तळ नष्ट केले जातायत. अनेक इमारतींचा ढिगारा झालाय. आता इस्रायलने आपल्या बंधकांना सोडवण्यासाठी रशियाकडे मोर्चा वळवला आहे. इस्रायलला रशियाची मदत हवी आहे.
बंधकांच्या सुटकेसाठी इस्रायलची रशियाशी चर्चा सुरु आहे. हमासच्या ताब्यात 203 इस्रायली नागिरक आहेत. इस्रायल एकाबाजूला ग्राऊंड ऑपरेशन कधीही सुरु करेल अशी धमकी देतोय, त्याचवेळी पडद्यमागे रशियाशी चर्चा सुरु आहे. दोन अमेरिकन नागरिकांना सोडल्याची माहिती हमासने दिलीय. आई आणि मुलीची हमासकडून सुटका करण्यात आलीय.
अमेरिकन नेवीच हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर
एका बाजूला बंधकांना सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुसऱ्याबाजूला इस्रायलच्या सरंक्षण मंत्र्यांनी म्हटलय की. गाझामध्ये घुसून हमासला संपवू. मोठ्या प्रमाणात इस्रायली सैन्य, रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. सॅटलाइट फोटो समोर आलेत. आता या युद्धा अमेरिकेची एंट्री झाली आहे. अमेरिकन नौदल इस्रायलच्या शत्रूंना आपली ताकत दाखवत आहे. इस्रायलवर आता येमेनच्या हौती बंडखोरांनी हल्ला केला. पण लाल समुद्रात उपस्थित असलेल्या अमेरिकन नौदलाच्या युद्ध जहाजांनी हा हल्ला यशस्वी होऊ दिला नाही.
हमासचे 100 तळ नष्ट
इस्रायलचे गाझा पट्टीत हल्ले सुरु आहेत. 10 तासात हमासचे 100 तळ नष्ट करण्यात आले आहेत. शस्त्रास्त्रांचे डेपो आणि बंकरही नष्ट केलेत. इस्रायलच्या निशाण्यावर हमासचे बंकर आहेत. हमासने अशा 2500 बंकरचा वापर कारस्थान रचणं, लपण्यासाठी आणि स्वत:ला वाचवण्यासाठी केला. इस्रायलने आता बंकर्सना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या दौऱ्यानंतर इस्रायलने अधिक जोरदार हल्ले सुरु केलेत.
तिसर सर्वात जुन चर्च उद्धवस्त
घातक एयरस्ट्राइकमध्ये दीर-अल-बलाह भागातील हमासच कार्यालय उडवण्यात आलं. त्याशिवाय इस्रायलच्या हल्ल्यात जगातील तिसर सर्वात जुन चर्च सेंट पोर्फिरियस उद्धवस्त झालं. IDF च्या हल्ल्यात हमासच्या नौदलाचा अमजद ओदेह मारला गेला. 7 ऑक्टोबरच्या नरसंहाराचा तो सुद्धा मास्टरमाइंड होता. त्यासोबतच नेवल कमांडर मबदुह अल-शलाबी आणि हमासचा दहशतवादी खालेद सबाह सुद्धा मारला गेला.