लंडन- बोरिस जॉन्सन (Boris Johnson)यांनी पंतप्रधान म्हणून मंगळवारी अखेरचे त्यांचे निवासस्थान सोडले. १० डाऊनिंग स्ट्रीटमधून (10 Downing Street) ते बाहेर पडले. हे इंग्लंडच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आहे. जॉन्सन बाहेर पडल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी एक काळ्या आणि पांढऱ्या रंगाची मांजर नजरेस पडली. ही मांजर डाऊनिंग स्ट्रीटच्या मेन गेटसमोर जाऊन बसून राहिली.
या मांजरीचे नाव आहे लैरी द कॅट, (Larry The Cat)लैरी ही पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या डाऊनिंग स्ट्रीटची स्थायी रहिवाशी आहे. गेल्या १५ वर्षात या मांजरीने डाऊनिंग स्ट्रीट या घरात आत्तापर्यंत तीन पंतप्रधान पाहिले आहेत. आता चौथ्या पंतप्रधान म्हणून लिज ट्रस या निवासस्थानी येणार आहेत. लैरी आता त्यांची वाट पाहते आहे. लैरीला कॅबिनेट ऑफिसची चीफ माऊसर म्हणून संबोधले जाते. चीफ माऊसर ही काही अधिकृत पदवी नव्हे, पण तिला त्याच नावाने ओळखले जाते.
जॉन्सन यांच्या अखेरच्या भाषणात लैरीचा उल्लेख होता. सुरुवातीला तिचे डॉग डिलियनशी चांगले संबंध नव्हते. नंतर मात्र सर्व काही ठीक झाले असे ते म्हणाले.
मांजरी पाळण्याच्या ब्रिटीश पंरपरेचा लैरी हा एक महत्त्वाचा भाग आहे. इंग्लंडमध्ये पुराणकाळापासून मांजरी पाळण्याची परंपरा आहे. डाऊनिंग स्ट्रीटमध्येही अनेक मांजरी राहिल्या आहेत. पण लैरी पहिल्यांदाच चीफ माऊसर म्हणून संबोधली जाते.
लैरीला २०२१ साली डाऊनिंग स्ट्रीटमधील कर्मचाऱ्यांनी वाचवले होते. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डेव्हीड मॅमरुन यांच्या मुलांसाठी ही पाळीव प्राणी म्हणून पंतप्रधानांच्या निवासस्थानी आली. काही वर्षांतच ती चीफ माऊसर बनली. ब्रिटन सरकारच्या वेबसाईटच्या नुसार पंतप्रधान निवासस्थानात येणाऱ्या प्रत्येकाला भेटणे, हे तिचे काम आहे. लैरीची देखभालही सरकारी पैशांतून करण्यात येते.
लैरी सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहे. ट्विटरवर लैरीच्या नावाचे एक अनधिकृत अकाऊंटही आहे. तिथे तिचे ६.५ लाख फॉलो्र्स आहेत. ७ जुलैला या ट्विटर अकाऊंटवरुन तिने लिहिले आहे की- मी बोरिस जॉन्सन यांची मांजर नाही. सगळ्या पंतप्रधआनांप्रमाणे बोरिसही पर्मनंट नाहीत. मात्र मी इथे पर्मनंट आहे. बोरिस गेल्यानंतरही मी इथेच राहीन.
२०१९ साली अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळीही तिचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा ती ट्रम्प यांच्या गाडीखाली डुलक्या घेत होती. २०२० साली जेव्हा इंग्लंड ब्रेक्झिट करारात मग्न होते, तेव्हाही लैरी पुन्हा व्हायरल झाली होती. त्यावेळी लैरी ला पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर कबूतर पकडताना कॅमेरात कैद करण्यात आले होते.
इंग्लंडच्या निवडणुकांत अखेरच्या टप्प्यात लैरी द कॅटचे पोस्टर्स पूर्ण लंडनमध्ये पाहायला मिळाले होते. ऑगस्टमध्ये एका कार्यक्रमात लिज ट्रस यांनी तिचे कौतुकही केले होते. त्या म्हणाल्या होत्या की- लैरीसोबत माझे चांगले संबंध आहेत. ती नेहमीच माझी बाजू घेते. मला वाटतं तिच्या आवडीच्या बॅबिनेट मंत्र्यांत माझे नाव आहे. ट्रस यांनी प्रचारात म्हटले होते की, डाऊनिंग स्ट्रीटमध्ये लैरीसाठी सुरक्षित जागा आहे.