अमेरिकेतील ‘सीआयए’चे प्रमुख भारत वंशीय व्यक्तीकडे? कोण आहे काश पटेल? ISIS ते बगदादीपर्यंत सर्वांचा केला होता सफाया

| Updated on: Nov 07, 2024 | 12:10 PM

Who is kash patel: अमेरिकेतील सुरक्षा आणि संरक्षणविषयक अनेक मुद्द्यांवर काश पटेल यांनी ट्रम्प यांना प्रभावित केले आहे. ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या पटेल यांना त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रध्यक्षांसाठी असणाऱ्या सल्लागारांच्या गटात सर्वोच्च अध्यक्षपद देण्यात आले होते.

अमेरिकेतील सीआयएचे प्रमुख भारत वंशीय व्यक्तीकडे? कोण आहे काश पटेल? ISIS ते बगदादीपर्यंत सर्वांचा केला होता सफाया
kash patel
Follow us on

Who is kash patel: अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे. ते आता जानेवारी महिन्यात राष्ट्रध्यक्षपदाची सूत्र हाती घेणार आहेत. त्याचवेळी ट्रम्प प्रशासनामध्ये कोण असणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेत भारत वंशीय व्यक्ती काश पटेल यांचे नाव सर्वात पुढे आले आहे. अमेरिकेच्या सीआयए (सेंट्रल इंटेलिजेंस एजेंसी) प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. काश पटेल हे ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू सरदार आहे.

कोण आहेत काश पटेल?

काश पटेल यांचा संबंध भारतातील गुजरात राज्याशी आहे. त्यांचे आई-वडील युगांडमध्येच राहिले. 1970 च्या दशकात ते गुजरातमधून अमेरिकेत गेले होते. 1980 मध्ये काश पटेल यांचा जन्‍म न्‍यूयॉर्कमधील गार्डन सिटीमध्ये झाला. त्यांना कायद्याची पदवी घेतली. काश पटेल यांनी कार्यवाहक संरक्षण सचिव ख्रिस्तोफर मिलर यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले. याआधी त्यांनी राष्ट्रपतींचे उप सहाय्यक आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत दहशतवादविरोधी वरिष्ठ संचालक म्हणूनही काम केले आहे.

ISIS-बगदादीचा खात्मा केला…

डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात काश पटेल यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्यांची इसिस, अल बगदादी, कासिम अल रिमी सारखा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात महत्वाची भूमिका होती. त्यानंतर काश पटेल हे ट्रम्प यांच्या नजरेत आले. काश पटेल यांनी अमेरिकन बंधकांना पुन्हा देशात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.

हे सुद्धा वाचा

पटेल 2019 मध्ये हाऊस इंटेलिजन्स कमिटीच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये होते. अमेरिकेतील सुरक्षा आणि संरक्षणविषयक अनेक मुद्द्यांवर त्यांनी ट्रम्प यांना प्रभावित केले आहे. ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या पटेल यांना त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रध्यक्षांसाठी असणाऱ्या सल्लागारांच्या गटात सर्वोच्च अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, पटेल हे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतही वादात सापडले आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात पटेल अनेक वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी शत्रूत्व पत्कारले होते.