डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी डीबेट होणार आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कमला हॅरिस यांना आपले मत अतिशय ठामपणे मांडण्याची संधी मिळणार आहे. जो बायडेन यांची जागा घेतल्यापासून त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. कमला हॅरिस यांना पाठिंबा वाढत आहे. अध्यक्ष जो बायडेन आणि ट्रम्प यांच्यात शेवटची चर्चा झाली, ज्यामध्ये निराशाजनक कामगिरीनंतर बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर झाले होते. त्यांनी 21 जुलै रोजी हॅरिसला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली.
5 नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आता 60 दिवसांपेक्षा कमी कालावधी उरलाय. कमला हॅरिस गुरुवारी उत्तर कॅरोलिनामध्ये दौरा सुरू करणार आहेत. तर शुक्रवारी त्या पेनसिल्व्हेनियाला जतील. नंतर वॉल्झ मिशिगन आणि विस्कॉन्सिनला भेट देणार आहेत.
निर्णायक चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या विरोधकांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक इशारा देणारी पोस्ट लिहिली आहे. निवडणुकीत अप्रामाणिकपणा करणाऱ्या लोकाना तुरुंगात टाकण्याची धमकी त्यांनी दिलीये. निवडणुकीच्या प्रामाणिकतेवर पुन्हा शंका उपस्थित केली आहे. ट्रम्प म्हणाले की, कृपया काळजी घ्या. हा कायदेशीर धोका वकील, राजकीय कार्यकर्ते, देणगीदार, बेकायदेशीर मतदार आणि भ्रष्ट निवडणूक अधिकारी यांच्यापर्यंत आहे.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी रविवारी सांगितले की, अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराचे रूपांतर नरकमय शो आणि हॅलोविनमध्ये झाले आहे. जे संपूर्ण वेडेपणाचे साक्षीदार आहे. हे उल्लेखनीय आहे की पाश्चात्य देशांमध्ये, हॅलोविन सण त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी साजरा केला जातो.