Iran Air strike in Pakistan | दावोसच्या विश्व आर्थिक फोरममध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री होसैन अमीर-अब्दुल्लाहियन आणि पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक काकर यांची भेट झाली. त्याचवेळी इराणी मीडियानुसार, इराणच्या IRGC ने पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये जैश-अल-अदलच्या दोन दहशतवादी तळांना मिसाइल आणि ड्रोनने टार्गेट केलं. यात 2 लहान मुलांचा मृत्यू झाला असून 3 मुली जखमी झाल्या आहेत.
पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात कुहे सब्ज क्षेत्रात जैश उल-अदलचा मोठा दहशतवादी तळ होता, असं इराण सरकारच्या मेहर वृत्त संस्थेने म्हटलय. आपल्या हवाई क्षेत्राच उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचा निषेध केला आहे. पाकिस्तानने या हल्ल्याला बेकायद कृत्य ठरवलं. पाकिस्तानने तेहरानमध्ये इराणच्या पराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यासमोर कठोर शब्दात निंदा केली आहे. इराणी दूतावासाच्या अधिकाऱ्याला सुद्धा पाकिस्तानने बोलवून घेतलय.
इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्सने काय म्हटलय?
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, जैश उल-अदल ही पाकिस्तान-इराण सीमेवर सक्रीय असलेली दहशतवादी संघटना आहे. त्यांनी इराणी सुरक्षा पथकांवर हल्ले केले आहेत. एअर स्ट्राइक हा जैश अल अदलने केलेल्या हल्ल्याचा बदला आहे, अस इराणने म्हटलय. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सनुसार डिसेंबर महिन्यात जैश अल अदलने इराणमध्ये मोठा हल्ला केला होता. यात इराणच्या 11 पोलिसांचा मृत्यू झाला होता.
इराणने काय स्पष्ट केलय?
जैश अल अदलच्या हल्ल्यात इराणच मोठ नुकसान झालं होतं. जैश अल अदल ही संघटना आधी सुन्नी बलूच संघटना जुंदल्लाहसोबत होती. ते नंतर वेगळे झाले. पाकिस्तानच्या ISI सोबत जुंदल्लाह आणि जैश अल अदलचे घनिष्ठ संबंध आहेत. पाकिस्तानने इराण विरोधात जैश अल अदलचा वापर केला. इराणने या बद्दल वारंवार पाकिस्तानकडे नाराजी व्यक्त केली होती. कुठलीही दहशतवादी संघटना आमच्याविरोधात कारवाई करत असेल, तर आम्ही त्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत जाऊ हे इराणने स्पष्ट केलय