Modi UAE and qutar visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज UAE आणि कतारचा दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. UAE च्या अबुधाबी शहरात पंतप्रधान मोदी भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर ते भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. अहलान मोदी असे या कार्यक्रमाचे नाव ठेवण्यात आले असून ६५ हजार लोकांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. पंतप्रधान मोदींचा हा सातवा यूएई दौरा असणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी कतारला रवाना होतील. कतारने भारताच्या आठ माजी नौसैनिकांची सुटका केल्याने त्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींचा दौरा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे त्याला देखील महत्त्व आले आहे.
आखाती देशातील सर्वात महत्त्वाचा देश सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान जी-20 बैठकीदरम्यान भारताच्या दौऱ्यावर आले होते. भारतासोबत मैत्रीसाठी आखाती देशांमध्ये चढाओढ लागली आहे. हे भारताचे वाढते महत्त्व आणि स्थान यामुळे असल्याचं तज्ज्ञांनी सांगितले आहे.
आखाती देशांमध्ये भारतासोबत मैत्रीचे संबंध आणखी दृढ करण्यामागचं कारण आहे ते म्हणजे भारतीय लोकं. कारण 75 लाख भारतीय आखाती देशांमध्ये काम करतात आणि दरवर्षी सुमारे $40 अब्ज डॉलरचे परकीय चलन येथून भारतात येते. आखाती देशांसोबतचा भारताचा व्यापार 150 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. अनेक भारतीय लोकं हे आखाती देशांमध्ये व्यवसाय करतात. त्यामुळेच भारतीय लोकांना विशेष महत्त्व आहे.
आखाती देश हे तेलाने समृद्ध आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. युक्रेन युद्धाच्या आधी भारत या आखाती देशांकडून ७५ टक्के तेल खरेदी करत होता. आताही भारत आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करतो. पण रशिया देखील भारताला मोठ्या प्रमाणात तेल पुरवत आहे. दुसरीकडे भारत हा कतारचा गॅसचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारताने कतारसोबत अब्जावधी डॉलर्सचा करार केला आहे. आखाती देशांमध्ये भारताची प्रतिमा चांगली आहे.
आखाती देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये भारताने कधीही हस्तक्षेप केला नाही, असे या भारतीय तज्ज्ञाने सांगितले. मुस्लीम देशांमधील संघर्षात भारत कधीच सहभागी झाला नाही. अरब देशांच्या विकास योजनांचा भारत समर्थक राहिला आहे. कमर आगा म्हणाले की आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताची अर्थव्यवस्था खूप मजबूत होत आहे आणि ती सुमारे 4 ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे. भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे.
आखाती देश आणि भारतात गुंतवणूक वाढत आहे. अमेरिकेतील आर्थिक मंदीनंतर सौदी अरेबियाने लूक ईस्ट पॉलिसी तयार केली. यानंतर त्यांनी भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि चीनसोबत संबंध मजबूत करण्यास सुरुवात केली.
आखाती देशांमध्ये भारतीय कामगारांचा जो आदर केला जातो तो पाकिस्तानवरील लोकांना मिळत नाही. जेव्हा सौदी अरेबियाने पाकिस्तानला हुथींविरुद्धच्या युद्धात मदत मागितली तेव्हा त्याने मदत नाकारली. सौदी अरेबियात पाकिस्तानी नागरिक गुन्ह्यात अडकतात. भारतीय कामगार तिथे चांगले राहतात आणि काम करतात.
भारतातील बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री देखील खूप लोकप्रिय आहे. याआधी राज कपूर खूप लोकप्रिय होते. त्यामुळे आखाती देशातील लोक आणि भारतीय यांचे संबंध चांगले बनले. ते म्हणाले की, कतारसोबत भारताचे संबंध खूप चांगले असणार आहेत.