मॉस्को : रशियाचे उद्योगपती व्लादिमीर पोतानिन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या बायकोने घटस्फोटाच्या पोटगीसाठी लंडनच्या एका न्यायालयात अर्ज केला आहे. नतालिया पोतानिन आणि व्लादिमीर पोतानिन यांचा घटस्फोट झाला आहे. व्लादिमीर पोतानिन यांच्या मालकीच्या कंपनीचा 50 टक्के हिस्सा आपल्याला मिळावा अशी मागणी नतालिया यांनी केली आहे. व्लादिमीर पोतानिन यांच्या मालकिच्या असलेल्या MMC Norilsk Nickel PJSC या कंपनीची किंमत तब्बल 14 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास दहा हजार आठशे कोटी रुपये आहे. यातील अर्धा हिस्सा म्हणजे जवळपास 5400 कोटी रुपयांची मागणी नतालिया यांनी केली आहे.
दरम्यान नतालिया यांच्या बाजूने हा निकाल लागल्यास हा जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट होऊ शकतो. यापूर्वी अॅमझॉनचे फाऊंडर जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा देखील घटस्फोट झाला आहे. जेफ बेझोस यांनी आपल्या पत्नीला घटस्फोटानंतर तब्बल 2.75 लाख कोटी रुपये दिले होते. हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट मानण्यात येतो. त्यानंतर नंबर लागतो तो बिल गेट्स यांचा गेट्स यांनी देखील आपल्या पत्नीला कोट्यावधी रुपये दिले होते, आणि आता जर व्लादिमीर पोतानिन यांच्या बायकोच्या बाजुने निकाल लागल्यास, पोतानिन यांना तब्बल 5400 कोटी रुपये द्यावे लागणार आहे. म्हणजेच हा जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यानंतर जगातील सर्वात महागडा तिसरा घटस्फोट ठरणार आहे.
व्लादिमीर पोतानिन हे रशियाचे प्रसिद्ध उद्योगपती आहे. रशिया आर्थिक संकटात सापडला असताना देशाला संकटातून बाहेर काढण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच त्यांना रशियाचे उपपंतप्रधान बनवण्यात आले होते. पोतानिन यांचा जगातील काही निवडक श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश होतो. त्यांचा जागतिक श्रीमंतांच्या क्रमवारीमध्ये 55 वा क्रमांक लागतो. MMC Norilsk Nickel PJSC या प्रसिद्ध कंपनीचे ते मालक आहेत. त्यांचा नुकताच घटस्फोट झाला असून, त्यांच्या पत्नीने कंपनीमधील पन्नास टक्के हिस्सा मागितला आहे.
आता आयपीपीबीच्या अॅपवरून देखील करता येणार सिलिंडरची बुकिंग; जाणून घ्या काय आहे फायदा?
Online Fraud : ऑनलाइन व्यवहार करताय? फॉलो करा ‘या’ टिप्स, नाहीतर सायबर ठग घेतील गैरफायदा
माझे रेशन अॅप लाँच; रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे झाली सोपी, जाणून घ्या काय आहेत फायदे