Next PM: नारायण मूर्तींचा जावई होणार इंग्लंडचा पंतप्रधान? इंग्लंडचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा..

| Updated on: Jul 07, 2022 | 5:27 PM

बोरिस जॉन्सन यांच्या निवडणूक प्रचारात ऋषी यांची भूमिका महत्त्वाची होती. प्रेस ब्रिफिंगमध्येही सरकारचा चेहरा म्हणून बऱ्याचदा तेच सामोरे येत असत. अनेक वेळी टीव्हीवरील चर्चांमध्ये बोरिस यांच्या ऐवजी ऋषीच चर्चेला आणि प्रश्नांना सामोरे जात असत. याच्याविरोधात कामगार पक्षाने अनेकदा प्रश्नही उपस्थित केले होते. नेमके पंतप्रधान आहेत तरी कोण असा प्रश्नही विचारण्यात येत असे.

Next PM: नारायण मूर्तींचा जावई होणार इंग्लंडचा पंतप्रधान? इंग्लंडचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा..
भारताचा जावई होणार इंग्लंडचा पंतप्रधान?
Image Credit source: social media
Follow us on

लंडन – इंग्लंडचे पंतप्रधान (Britan Prime minister)बोरिस जॉन्सन (Boris Johnson)यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवा पंतप्रधान (New PM)कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. या स्पर्धेत सहा नावे आहेत, आणि त्यात भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानण्यात येते आहे. ऋषि सुनक हे जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थखाते सांभाळत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला होता. ऋषिक सुनक हे भारतीय वंशाचे आहेत. इतकेच नाही तर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. मूर्ती यांची कन्या अक्षता यांचे ऋषी हे पती आहेत. त्यांना पंतप्रधानपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली तर तो ऐतिहासिक क्षण असेल.

ऋषी सुनक यांच्याविषयी

बोरिस जॉन्सन यांच्या निवडणूक प्रचारात ऋषी यांची भूमिका महत्त्वाची होती. प्रेस ब्रिफिंगमध्येही सरकारचा चेहरा म्हणून बऱ्याचदा तेच सामोरे येत असत. अनेक वेळी टीव्हीवरील चर्चांमध्ये बोरिस यांच्या ऐवजी ऋषीच चर्चेला आणि प्रश्नांना सामोरे जात असत. याच्याविरोधात कामगार पक्षाने अनेकदा प्रश्नही उपस्थित केले होते. नेमके पंतप्रधान आहेत तरी कोण असा प्रश्नही विचारण्यात येत असे.

नाराणय मूर्ती यांच्या मुलीशी विवाह

सुनक यांचा विवाह इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायम मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत झालेला आहे. २०१५ साली ते पहिल्यांदा इंग्लंडमध्ये खासदार झाले. ब्रेक्झिटला समर्थनाची भूमिका घेतल्याने त्यांचे पक्षातील वजनही वाढले. युपोपीय संघातून इंग्लंडने बाहेर पडावे, या बोरिस जॉन्सन यांच्या भूमिकेचे त्यांनी समर्थनही केले. लोकप्रियता असताना त्यांना त्यांची पत्नी अक्षता यांच्यावर लागलेल्या टॅक्स चोरीच्या आरोपामुळे टीकेलाही सामोरे जावे लागले.

हे सुद्धा वाचा

अक्षता या इंग्लंडच्या नागरिक नाहीत

ऋषी यांच्या पत्नी अक्षता यांच्याकडे इग्लंडचे नागरिकत्व नाही. इंग्लंडच्या कायद्याप्रमाणे, देशाबाहेर होणाऱ्या कमाईवर त्यांना कर द्यावा लागत नाही. त्यामुळे सुनक आणि अक्षता यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. कोरोनाच्या काळात सुनक यांनी चांगले कार्य केले असले तरी या काळात इंग्लंडच्या नागरिकांवर त्यांनी करही आकारला असे सांगण्यात येते.

पंतप्रधानपदासाठी का आहेत पहिली पसंत

ऋषी सुनक यांनी कोरोना काळात देशाला आर्थिक मंदीतून सावरले. सर्व वर्गांना खूश ठेवण्यात ते यशस्वी ठरल्याचे सांगण्यात येते
२०२० साली हॉटेल इंडस्टरीला इट आऊट टू हेल्प या योजनेंतर्गत सव्वा पंधरा हजार कोटींची मदत दिली.
कर्मचारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना २०२१ साली दोन लाख रुपयांचा सहाय्यता निधी दिला.
देशातील पर्यन व्यवसायाला उभारी देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले.

इतरही पाच जण आहेत स्पर्धेत

ऋषी यांच्यासोबतच लिज ट्रस, जेरेमी हंट, नदीम जाहवी, पेनी मॉडेंट आणि बेन वॉलेस यांच्याही नावांची चर्चा आहे.