मानवास भावना असतात. त्यामुळे प्रत्येक बदलावर त्याच्याकडून प्रतिक्रिया उमटत असते. कधी कधी ताण तणाव असहाय्य झाल्यामुळे मानव जीवन संपवल्याचे घटनाही उघड झाल्या आहेत. परंतु आता दक्षिण कोरियातून एक वेगळीच घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी मानवाने नाही तर रोबोटने जीवन संपलवले आहे. त्याने जीण्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. रोबोटने केलेल्या या प्रकारानंतर आता शास्त्रज्ञ या घटनेचे कारण शोधण्यात लागले आहे.
रोबोटने जीवन संपवल्याची घटना दक्षिण कोरियात घडली. सेंट्रेल साऊथ कोरियाच्या नगरपालिकेने यासंदर्भात माहिती दिली. रोबोटच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. रोबोट सकाळी 9 ते 6 पर्यंत काम करत होता. तो पब्लिस सर्व्हिस करत होता. त्याचे कार्ड त्याला मिळाला आहे. एक कर्मचारी म्हणूनच त्याला वापर केला जात होता. एलिवेटर ऑपरेशनचे काम त्याला दिले होते. त्यामुळे तणावात येऊन त्याने हे पाऊल उचलले, असे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियामध्ये रोबोटकडून प्रचंड कामे करुन घेतली जातात. प्रत्येक दहा व्यक्तींमागे त्या ठिकाणी एक रोबोट आहे.
रोबोटच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळे दावे केले जात आहेत. यासंदर्भातील रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रोबोटवर कामाचा खूप ताण होता. त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. मध्य दक्षिण कोरिया नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा रोबोट गेल्या एक वर्षापासून गुमी शहरातील रहिवाशांना प्रशासकीय कामात मदत करत आहे. पायऱ्यांवरून उडी मारण्यापूर्वी रोबोटने असे काही केले, ज्याला लोक आत्महत्या मानत आहेत.
🚨 The world records the first case of robot suicide.
South Korea 🇰🇷
An investigation has started into a robot 'suicide.' The robot was seen idle at the bottom of some stairs, and later, witnesses saw it spinning on top of a building before falling off.
The robot worked in a… pic.twitter.com/aAmyRmgYSo
— Tom Valentino (@TomValentinoo) June 28, 2024
रोबोटने आत्महत्या केल्यानंतर दक्षिण कोरियामधील गुमी शहरातील लोकांनी दु:ख आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत. गुमीमधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोबोट कार्यालयातील प्रत्येक मजल्यावर जात होता. ऑक्टोंबर 2023 पासून त्याने हे काम सुरु केले होते. त्याच्या आत्महत्येच्या बातमीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.