न्यू यॉर्क, दि. 23 फेब्रुवारी 2024 | आपल्यापैकी अनेकांनी ॲनाकोंडा नावाचा चित्रपट पाहिला असेल. परंतु थरारक असणारा हा चित्रपट म्हणजे ॲनिमेशन होता. त्या ठिकाणाचे जंगल खरे असले तरी साप मात्र खोटे होते. चित्रपटात दाखवलेले साप म्हणजे ॲनाकोंडा होता. हा जगातील सर्वात मोठा साप आहे. जगातील सर्वात वजनदार साप आहे. या सापाचा शोध अॅमेझॉनमधील जंगलामध्ये अनेक शास्त्रज्ञ घेत होते. आता या रहस्यमयी आणि शक्तीशाली सापाचा शोध लागला आहे. ग्रीन ॲनाकोंडा (Green Anaconda) हा साप मिळाला आहे. त्याचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
ग्रीन ॲनाकोंडा हा जगातील सर्वात धोकादायक साप आहे. जगातील सर्वात लांब सापामध्ये त्याची गणना होते. जो ग्रीन ॲनाकोंडा मिळाला त्याचे डोके माणवाच्या डोक्याइतके मोठे आहे. लांबी 26 फूट आणि वजन 250 किलोग्रॅम आहे. ग्रीन ॲनाकोंडा हा दक्षिणी अमेरिकेतील नदीत मिळाला आहे. ॲनाकोंडा विशालकाय असला तरी त्याच्या संथ हालचाली आहे. परंतु प्रत्यक्षात तो चपळ आहे. शिकाऱ्याच्या शरीराला वेटोळे करुन त्याची श्वास घेण्याची शक्तीच संपवतो. त्यानंतर शिकार संपूर्ण गिळून टाकतो.
The world's largest snake has been discovered in the Amazon Rainforest: The Northern Green Anaconda measures 26 feet long and weighs 440 lbs – and its head is the same size as a human's. pic.twitter.com/XlaDk0qVYt
— Denn Dunham (@DennD68) February 21, 2024
उत्तर आणि दक्षिणी ग्रीन ॲनाकोंडा 10 दशलक्ष वर्षांपूर्वी वेगळे झाले, तर मोठे कोण ? याचा शोध सुरु होता. शास्त्रज्ञांनी त्याचा शोध घेण्यासाठी अॅमेझॉन जंगलात शोध सुरु केला. ॲनाकोंडाच्या चार जाती आहेत. त्यात ग्रीन ॲनाकोंडा हा सर्वात मोठा आहे. तो आपले संपूर्ण जीवन पाण्यातच घालवतो. त्यांच्या नाकपुड्या आणि डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला असतात. जेणेकरून ते पाण्याखाली असतानाही शिकार पाहू शकेल.
ग्रीन ॲनाकोंडा ऑलिव्ह हिरव्या रंगाचे असतात. त्याच्या शरीरावर मोठे काळे ठिपके असतात. हे अमेझॉन आणि ओरिनोको भागात आढळतात. त्याचे चोरटे हल्ले, संयम आणि वेग त्यांना सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक बनवतात. ते कॅपीबारा, मगर, हरिण, लहान गाय यासारखे प्राणी एकाच वेळी गिळू शकतो. हा साप विषारी नाही. तो आपली शिकाऱ्यास जखळून टाकतो. त्याला जोराने दाबल्यावर त्यांची संपूर्ण हाडे तुटून जातात. त्याची श्वास घेण्याची क्षमता संपवतो. त्यानंतर त्याला गिळून टाकतो.