5 जुलैला अमेझॉनचा राजीनामा, 20 जुलैला थेट अंतराळात उड्डान, काय आहे Amazon प्रमुख जेफ बेजोस यांचं बालपणीचं स्वप्न?

| Updated on: Jun 09, 2021 | 2:30 AM

जेफ बेजोस यांनी अंतराळात जाण्याची घोषणा केलीय. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. यानुसार जेफ बेजोस 20 जुलै रोजी अंतराळात जाणार आहे.

5 जुलैला अमेझॉनचा राजीनामा, 20 जुलैला थेट अंतराळात उड्डान, काय आहे Amazon प्रमुख जेफ बेजोस यांचं बालपणीचं स्वप्न?
Follow us on

Jeff Bezos News: Amazon वॉशिंग्टन : अमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस (Jeff Bezos) जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतील मोठं नाव आहे. त्यांच्या राहणीमान आणि छंदांची लोकांमध्ये चांगलीच चर्चा असते. आता Jeff Bezos पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते आपल्या श्रीमंतीमुळे चर्चेत नसून एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहेत. हे वेगळं कारण आहे जेफ बेजोस यांची अंतराळात जाण्याची घोषणा. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. यानुसार जेफ बेजोस 20 जुलै रोजी अंतराळात जाणार आहे (Worlds richest man Amazon CEO Jeff Bezos announce his journey to space on 20 july 2021)
.

“बेजोस यांचं 5 वर्षांचा असताना पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार”

Jeff Bezos यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊटवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. यात ते म्हणाले, “मी जेव्हा 5 वर्षांचा होतो तेव्हा मी अंतराळात जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आता 20 जुलै रोजी मी माझ्या भावासोबत हा प्रवास करणार आहे. माझा सर्वात चांगला मित्र या रोमांचकारी प्रवासात माझ्यासोबत असेल.”

Blue Origin flight च्या एअरक्राफ्टमधून प्रवास करणार

Jeff Bezos यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची कंपनी Blue Origin मार्फत लोकांना अंतराळ पर्यटनाची व्यवस्था करण्याची घोषणा केलीय. Blue Origin ने यावर्षी मे महिन्यात काही फ्लाईट लाँच केले आहेत. प्रत्येक फ्लाईटमध्ये 6 लोकांना जाता येणार आहे. कंपनीची नवी फ्लाईट New Shepered Space Tourism Rocket ची आतापर्यंत 14 वेळा यशस्वी चाचणी झालीय.

5 जुलैला बेजोस अमॅझॉनच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार

Jeff Bezos यांनी आधीच 5 जुलै रोजी ते Amazon च्या प्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलंय. फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांनी एक पत्र लिहित आपल्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली होती. Jeff Bezos यांच्या जागेवर Amazon Web Services चे प्रमुख Andy Jassy नवे सीईओ असतील.

हेही वाचा :

जेफ बेझॉससोबत घटस्फोटानंतर 38,66,37,65,00,000 ची मालकीण, मॅकेंझी स्कॉटचे आता शिक्षकाशी लग्न

नोकरी सोडून गॅरेजमध्ये काम, आता जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, वाचा एक प्रेरणादायी कहाणी

जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती राजीनामा देणार, पण नंतर काय करणार?

व्हिडीओ पाहा :

Worlds richest man Amazon CEO Jeff Bezos announce his journey to space on 20 july 2021