Drone Attack: यूएईवर हल्ला, 2 भारतीयांसह एकूण तिघे ठार, हल्ल्यामागे कुणाचा हात?

| Updated on: Jan 17, 2022 | 6:38 PM

Drone attack in Abu Dhabi Airport : येमेनच्या हाऊथीतील बंडखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेनं दिली आहे. या हल्ल्यानंतर भीषण आग लागली असून ड्रोन हल्ला होण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे.

Drone Attack: यूएईवर हल्ला, 2 भारतीयांसह एकूण तिघे ठार, हल्ल्यामागे कुणाचा हात?
यूएईतील हल्ल्यानंतर आगडोंब
Follow us on

यूएईमध्ये (UAE) एका भीषण हल्ल्यात 3 तेल टँकरचा स्फोट झाला आहे. या हल्ल्यात दोन भारतीयांसह तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. येमेनच्या हाऊथी बंडखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेनं दिली आहे. या हल्ल्यानंतर भीषण आग लागली असून ड्रोन हल्ला होण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. सौदी अरेबियानंतर आता येमेनच्या हाऊथी अतिरेक्यांनी आता यूएईवर हल्ला केल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. तीन मृतांपैकी एका दोघे भारतीय असून एक पाकिस्तानी नागरीक असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर सहा जण जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही तेल टँकरचा सगळ्यात आधी मुसाफा भागात स्फोट झाला. यानंतर अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Abu Dhabi International Airport) नवीन बांधकामाच्या ठिकाणी आग लागली. दरम्यान, यात विमानतळाचं कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त अजून तरी हाती आलेलं नाही. इराणच्या समर्थनात असलेल्या बंडखोरांनी हा हल्ला केला असल्याची कबुली दिली आहे.

हाऊथीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आबे. राजधानी अबुधाबीमध्ये दोन ठिकाणी आग लागल्याची माहिती सगळ्यात आधी पोलिसांना मिळाली. यातील एक आग मुसाफा येथे लागली, तर दुसरी विमानतळावर लागली होती. ड्रोन हल्ला करत निशाणा साधला गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. हाऊथी संघटनेची संबंधित असलेल्या एका ट्वीटर अकाऊंटने दिलेल्या वर्तवलेल्या शक्यतेनुसार, हाऊथी बंडखोरांनी यूएईमध्ये मोठ्या हल्ल्याचा कट आखला असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

तपास सुरु

दरम्यान, या घटनेची तत्काळ दखल घेत याप्रकरणी तपासयंत्रणाही कामाला लागल्या आहेत. या हल्ल्याबाबत शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे. दुसरीकडे हल्ल्यात लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली असून कोणत्याही प्रकारचं मोठं नुकसान झालेलं नाही. आगीचं कारण शोधण्यासाठी चौकशीही सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, याआधीही हाऊथींनी सौदी अरेबियावर अनेकदा हल्ले केलेले आहेत. सौदी अरेबियातील तेल व्यवस्था आणि अनेक शहरांवर हौऊथींनी क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते. दरम्यान, आता हाऊथींनी सौदी अरेबियानंतर यूएईवरही हल्लाबोल केल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.

जगातील सर्वात मोठं मानवी संकट

सौदी अरब (Saudi Arabia) आणि संयुक्त अरब अमीरातच्या (United Arab Emirates) नेतृत्वातील संयुक्त सैन्याने मार्च 2015 मध्ये येमेनमध्ये अब्द-रब्बू मंसूर हादी यांच्या सरकारला सत्ता देण्यासाठी सैन्य हस्तक्षेप केला. मात्र, त्यानंतर या भागात मोठा संघर्ष उभा राहिलाय. यात आतापर्यंत हजारो सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय. या घटनाक्रमातूनच जगातील सर्वात मोठं मानवी संकट उभं ठाकलं आहे

संबंधित बातम्या :

Yemen: सौदी अरबच्या नेतृत्वातील येमेन सैन्य छावणीवर मोठा हल्ला, 30 जवानांचा मृत्यू, तर 60 सैनिक जखमी

Yemen War : हूती बंडखोरांच्या हल्ल्यांनंतर येमेनमध्ये भीषण युद्ध, 48 तासात 65 लोकांचा मृत्यू