कौमार्य गमावल्यास तरूणींना ‘हे’ करण्यास भाग पाडले जाते; जाणून घ्या, इराणची डॉक्टर मंडळी का आहेत अस्वस्थ!

| Updated on: Jul 09, 2022 | 7:32 PM

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लग्नापूर्वी कौमार्य चाचणी घेणे सामान्य आहे. या देशांमध्ये, लोक सहसा कुमारी असलेल्या स्त्रिया किंवा मुलींशी लग्न करण्यास प्राधान्य देतात. यासाठी लग्नापूर्वी मुलीची कौमार्य चाचणी घेतली जाते. बदलत्या काळानुसार, कौमार्य चाचणीची ही प्रकरणे भारतात कमी होऊ लागली आहेत, परंतु जगात असे काही देश आहेत जिथे असं करणे सामान्य बाब आहे.

कौमार्य गमावल्यास तरूणींना ‘हे’ करण्यास भाग पाडले जाते; जाणून घ्या, इराणची डॉक्टर मंडळी का आहेत अस्वस्थ!
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली: भारतासह जगभरातील महिलांना अनेक निषिद्धांना सामोरे जावे लागते, त्यापैकी एक म्हणजे कौमार्य. भारतात आजही अशी अनेक प्रकरणे रोज समोर येतात जिथे लग्नाआधी मुलीची कौमार्य चाचणी घेतली जाते, तर पुरुषांसाठी असे कोणतेही बंधन नाही. असं म्हणतात की, काळाच्या ओघात या गोष्टी कमी झाल्यात पण त्या आजही पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत. अजूनही असे अनेक देश आहेत जिथे लग्नाआधी मुलींची कौमार्य चाचणी (Virginity test) करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि त्या आधारावर तिच्याशी लग्न करायचं की, नाही हे ठरवलं जातं. असाच एक देश आहे, जिथे कौमार्य चाचणीच्या आधारे (Based on the test) हुंडा घेण्याचा निर्णय घेतला जातो. होय..आपण इराणबद्दल बोलत आहोत. या देशांमध्ये, लोक सहसा कुमारी असलेल्या स्त्रिया किंवा मुलींशी लग्न करण्यास प्राधान्य (Prefer to get married) देतात. यासाठी लग्नापूर्वी मुलीची कौमार्य चाचणी घेतली जाते.

चाचणी करणे बंधनकारक

इराणमध्ये राहणाऱ्या हजारो महिला आणि मुलींसाठी लग्नापूर्वी कौमार्य चाचणीस सामोरे जाणे बंधनकारक आहे. ही चाचणी कोणत्याही वैद्यकीय आधाराशिवाय घेतली जाते. या चाचणीत अपयशी ठरलेल्या महिलांना शस्त्रक्रिया(हायमेन रिप्लेसमेंट सर्जरी) करण्यास भाग पाडले जाते. कौमार्य चाचणीत नापास महिलांची हत्या झाल्याचीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

कौटुंबिक दबावामुळे करावे लागते

कौमार्य चाचणीसाठी कोणताही वैद्यकीय आधार नाही, परंतु इराणमध्ये राहणारे लोक ही चाचणी करण्यासाठी मुलीवर दबाव आणतात. या कौमार्य चाचणीवर इराणी महिलांचे म्हणणे आहे की, त्यांना हे चारित्र्य प्रमाणपत्र अजिबात आवडत नाही. कारण त्यासाठी त्यांना एका विचित्र चाचणीतून जावे लागते. कौमार्य चाचणीसाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या एका महिलेने सांगितले की, तिला इथे येण्याची अजिबात इच्छा नव्हती पण, कौटुंबिक दबावामुळे तिला हे करावे लागले.

हे सुद्धा वाचा

हायमेन रिप्लेसमेंट’ सर्जरी सर्वात मोठा धंदा

इराणमध्ये लोक त्यांच्या मुली आणि पत्नींना वैद्यकीय केंद्रात घेऊन जातात आणि त्यांची चाचणी करवून घेतात. इराणच्या काही भागात कौमार्य संबंधित या प्रथा अजूनही पाळल्या जातात. या प्रथांनुसार लग्नाच्या रात्री, ज्याला मधुचंद्र असेही म्हणतात, मुलीच्या पलंगावर पांढरी चादर किंवा रुमाल अंथरला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यावर रक्ताचे डाग दिसतात. याशिवाय कौमार्य चाचणीत अपयशी ठरणाऱ्या महिलांवर ‘हायमेन रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव टाकला जातो. यासाठी इराणमध्ये खूप पैसाही खर्च केला जातो. इराणमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. फरीमा फराहानी म्हणतात की दुर्दैवाने, ही ‘हायमेन रिप्लेसमेंट’ सर्जरी इराणमध्ये पैसे कमवण्याचा सर्वात मोठा धंदा बनला आहे.

वैद्यकीय शास्त्रात कुठलीच मान्यता नाही

‘हायमेन’ रिपेअर करताना स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्टचा भाग शिवून टाकला जातो आणि जेव्हा संभोग होतो तेव्हा हा शिवलेला भाग चिरतो त्यामुळे रक्तस्त्राव होतो. महिलांकडून अशीच अपेक्षा असणारे बरेच लोक आहेत. परंतु येथे सर्रास वापरात असलेल्या हायमेन दुरुस्ती शस्त्रक्रियेला वैद्यकीय शास्त्रात कुठलीच मान्यता नाही. लिंग संशोधक झायरा बघेर-शाद यांनी सांगितले की, कौमार्य चाचणीत अपयशी ठरणाऱ्या महिलांना अनेक वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. एखादी मुलगी कुमारी नसल्याचे किंवा लग्नाआधी गैर-पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवल्याचे आढळून आल्यावर अनेक वेळा तिचा जीव घेतला जातो.