देशात सध्या पूजा खेडकर या चर्चेत आहेत. सोमवारी UPSC स्कॅम हॅशटॅग सोशल मीडियावर व्हायरल होत होते. पूजा खेडकर यांच्या निवडीवर लोकं आता प्रश्नचिन्ह उपस्थित करु लागले आहेत. IAS पूजा खेडकर यांच्यानंतर आता आणखी एका IAS अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आले आहे. IAS पूजा खेडकर यांचं नाव पुढे आल्यानंतर लोक हाच प्रश्न विचारत आहेत की मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती देखील कोट्यातून IAS होऊ शकतो का? पुण्याचे जिल्हाधिकारी दुहास दिवसे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. UPSC मध्ये अपंग कोट्याद्वारे निवडीची संपूर्ण प्रक्रिया काय आहे चला जाणून घेऊयात.
अरुणाचलमध्ये तैनात असलेल्या IAS इरा सिंघल यांनी 2014 मध्ये UPSC परीक्षेत संपूर्ण अव्वल स्थान मिळवले होते. त्या लोकोमोटर डिसॅबिलिटी या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांना याविरोधात बराच काळ संघर्ष करावा लागला होता. IAS इरा यांनी सांगितले की, अपंगत्व कोटा हा एकूण 4 प्रकारचा असतो. ऑर्थो, व्हिज्युअल, श्रवण, एकाधिक अपंगत्व असे चाप प्रकार असतात. RPwD (अपंग व्यक्तीचे हक्क) ACT मध्ये 21 प्रकारच्या अपंगांना मान्यता देण्यात आली आहे. ॲसिड अटॅक सर्व्हायव्हरला देखील या कोट्यातून नोकरी मिळू शकते. एखादा उमेदवार दर परीक्षेसाठी फॉर्म भरताना अपंग असल्याचा दावा करतो. तेव्हा त्याची मेडिकल टेस्ट ही मुलाखतीत निवड झाल्यानंतर केली जाते. दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये UPSC द्वारे निश्चित केलेल्या वेळ आणि तारीखेला अशा लोकांची पडताळनी केली जाते. लोकांची पडताळणी एका वैदकीय मंडळाकडून होते जी यूपीएससीशी संलग्न आहे.
आयएएस इरा सिंघल यांनी माहिती दिली की, RPWD अंतर्गत 21 अपंग नोंदणीकृत आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्या म्हणाल्या की, लोक या कोटाच्या माध्यमातून आयपीएस सेवेत रुजू झाले आहेत, परंतु हे शक्य नाही. कारण कोणताही PWD उमेदवार IPS आणि पोलीस सेवेत सामील होऊ शकत नाही. पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणे कोणताही उमेदवार दोन वर्षांसाठी प्रोबेशनवर असतो. या दोन वर्षांत त्या उमेदवाराची वैद्यकीय पडताळणी केली जाते. जर त्या दोन वर्षात त्यांने वैद्यकीय पडताळणी करुन घेतली नाही तर त्या व्यक्तीला काढून टाकले जाते. हा नियम अगदी स्पष्ट आहे. कोटा मंजूर होईपर्यंत पोस्टिंग सशर्त असते.
उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे अपंगत्व हे 40 टक्के असले तरीही त्याला सेवेत घेतले जाते. कोणत्याही वैद्यकीय मंडळाने 40 टक्के लिहिले तर ते प्राथमिक स्तरावर वैध आहे. आयएएसमध्ये निवडीसाठी UPSC द्वारे मंजूर केलेले वैद्यकीय मंडळ उमेदवार खरोखर अक्षम आहे की नाही हे ठरवते. पूजा खेडकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात ती वैद्यकीय मंडळाकडे गेली नाही. कोरोनाच्या काळामुळे ती पडताळणी पुढे गेली. पूजा खेडकर यांनी पुन्हा पुन्हा मुदतवाढ घेतली. पुन्हा तारीख दिल्यावर त्या जात नव्हत्या. जर कोणी पोलिओचा बळी असेल आणि त्याचे अपंगत्व 40% नसेल. तर त्या उमेदवाराला या कोट्यातून घेतले जात नाही. प्रमाणित प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही प्रकारच्या कोट्याचा लाभ मिळत नाही.