कोणतीही ट्रेनिंग फुकटात घ्या, वर रोज 500 रुपयेही मिळणार, सरकारची मोठी घोषणा; कुणाला मिळणार लाभ? अर्ज कसा करायचा?

| Updated on: Nov 16, 2024 | 4:13 PM

केंद्र सरकारची पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना हातातील कौशल्यांना वाव देणारी एक महत्वाची योजना आहे. या योजनेतून मूर्तीकार, लोहार, वस्त्रोद्योग आणि अशाच पारंपारिक व्यवसायातील कारागीरांना मोफत प्रशिक्षण, दररोज 500 रुपये भत्ता, आणि 3 लाख रुपयांपर्यंत कर्जासारखे अनेक फायदे मिळतील. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि ऑनलाइन अर्ज करता येतो. ही योजना पारंपारिक व्यवसायांचे संवर्धन करण्यास मदत करेल.

कोणतीही ट्रेनिंग फुकटात घ्या, वर रोज 500 रुपयेही मिळणार, सरकारची मोठी घोषणा; कुणाला मिळणार लाभ? अर्ज कसा करायचा?
Follow us on

हातात कौशल्य असणाऱ्यांना रोजगार देण्यासाठी आणि पारंपारिक व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. यात मूर्तीकार, खेळणी तयार करणारे, लोहार आणि पारंपारिक व्यवसायाशी निगडीत लोकांना सामील करण्यात आलं आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकार लोकांना केवळ फक्त ट्रेनिंगच देणार नाही तर या कामाच्या बदल्यात त्यांना रोज 500 रुपये प्रशिक्षण भत्ताही देणार आहे. या योजनेचे अनेक फायदे आहेत. योजनेसाठी अर्ज कसा करायचा? त्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घ्या.

अर्ज कोण करू शकतो?

मिस्त्री, होडी तयार करणारा, टाळा चावी तयार करणारे, दगडांना आकार देणारे, दगडफोडणारे, हातोडा आणि टुलकिटचे निर्माते, चप्पल, बूट तयार करणारे कारागिर, मूर्तीकार, टोपली, चटाई आणि झाडू बनवणारे, शस्त्र निर्माते, बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, न्हावी, धोबी, माळा तयार करणारे, शिंपी, फिशिंग नेट बनवणारे, सोनार, लोहार आदी. यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारची कामे करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. तुम्ही अर्ज करू शकता.

योजनेचे लाभ काय?

पीएम विश्वकर्मा योजनेत सामील झाल्यावर अर्जदारांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला कुशल वर्कर म्हणून तयार कराल. त्यासाठी तुम्हाला दर दिवसाला 500 रुपये स्टापेंडही दिला जाणार आहे. त्यात इन्सेन्टिव्हचीही सुविधा आहे. योजनेतून प्रशिक्षण घेतल्यानंतर लाभार्थ्यांना टुलकिट खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये दिले जाणार आहे. जेणे करून त्यांना काम सहजपणे करता आलं पाहिजे.

गॅरंटीशिवाय लोन

याशिवाय लाभार्थी ट्रेनिंग घेतल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यासाठी त्यांना स्वस्त व्याज दरात कर्ज दिलं जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार केवळ 5 टक्के व्याजावर 300000 पर्यंतचं कर्ज देणार आहे. ही रक्कम दोन टप्प्यात दिली जाईल. पहिल्या टप्प्यात 100000 रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 200000 रुपयांचं लोन दिलं जाणार आहे.

अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनाच्या अधिकृत वेबसाईटवर जा

होम पेजवर अर्जासाठी Applyचं बटन मिळेल. त्यावर क्लिक करा

तुमच्या यूजर्स आयडी आणि पासवर्ड द्वारे लॉग इन करा. लॉग इन आयडी नसेल तर अकाऊंट तयार करा

त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल

फॉर्ममध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाका. त्यानंतर फॉर्म व्हेरिफाई करा

काही आवश्यक कागदपत्रांची कॉपी स्कॅन करून अपलोड करा

असं केल्यावर पीएम विश्वकर्मा सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याचा पर्याय ओपन होईल, त्यावर क्लिक करा

सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तुमची विश्वकर्मा डीजिटल आयडी मिळेल. ती या योजनेचा अर्ज भरण्यासाठी उपयोगाची ठरेल

लॉग इन बटनावर क्लिक करा आणि ज्या नंबरने तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे, तो मोबाईल नंबर टाका

तुम्ही अर्ज केल्यावर मुख्य अॅप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. त्यात विचारण्यात आलेली माहिती भरून सबमिट करा

अर्ज स्वीकारण्यात आल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल.