चावून खायचं की तसच गिळायचं? तुळशीच्या पानाचं नेमकं काय करायचं? वाचा सविस्तर

| Updated on: Sep 10, 2021 | 10:27 PM

तुळशीचं पान खायचं की तसच गिळून टाकायचं याबाबत संभ्रम आहे. पण मग नक्की कुठली पद्धत योग्य आहे? चावून खायची की गिळायची? आज आपण त्यातले वैज्ञानिक तसच पारंपारिक कोणती पद्धत योग्य आहे ते पाहुया. यात अर्थातच डॉक्टरांचही काय म्हणनं आहे तेही पाहुयात.

चावून खायचं की तसच गिळायचं? तुळशीच्या पानाचं नेमकं काय करायचं? वाचा सविस्तर
तुळशीची पानं चावून खायची की गिळून टाकायची? योग्य काय?
Follow us on

तुळशीची पानं हे विविध व्याधींवर गुणकारी आहेत हे सर्वांनाच माहित आहे. त्यासाठी तुळशीची पानं सहज कुणीही तोंडात टाकतं आणि बघता बघता गिळूनही टाकतात. काही जण चावून त्याचा चोथा करतात. रस आत घेतात आणि चोथा बाहेर टाकतात. याचाच अर्थ असा की, तुळशीचं पान खायचं की तसच गिळून टाकायचं याबाबत संभ्रम आहे. पण मग नक्की कुठली पद्धत योग्य आहे? चावून खायची की गिळायची? आज आपण त्यातले वैज्ञानिक तसच पारंपारिक कोणती पद्धत योग्य आहे ते पाहुया. यात अर्थातच डॉक्टरांचही काय म्हणनं आहे तेही पाहुयात.

तुळशीची पानं खायचे फायदे?
तुळशीच्या पानात अँटी बॅक्टरीया तत्व असतात. त्यामुळे सर्दी, खोकला अशा विविध आजरातून सुटका होऊ शकते. श्वास यंत्रणाही तुळशीच्या पानामुळे अधिक गतीमान होते. तसच तुळशीच्या पानातून जे द्रव बाहेर पडतं, त्यामुळे पचन यंत्रणा चांगलं काम करते. तुळशीच्या पानात असलेल्या अडौप्टोजेनमुळे स्ट्रेस कमी व्हायलाही मदत होते. याच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरण व्यवस्थित होतं तसच नर्व्हस सिस्टमही मोकळी होते. तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुळशीचं पान त्यावर गुणकारी ठरू शकतं. तसच ज्यांना अॅसिडीटी, गॅस, अपचण अशा समस्या आहेत, त्यांचीही तुळशीचं पान सुटका करु शकतं. तुळशीचं पान खाल्लं तर शरीराची पीच लेवल संतुलीत राहते. बॉडीला डिटॉक्स करतात आणि मेटाबॉलिजमचा रेट वाढवतात. विशेष म्हणजे ज्यांना वजन कमी करायचंय, त्यांना तुळशीच्या पानाची मदत होऊ शकते.

तुळशीचं पान नक्की कसं खायचं?
रात्री तुळशीच्या चार ते पाच पानानं स्वच्छ धुवून एका वाटीत पाण्यात टाका. त्यानंतर काहीही न खाता, उपाशीपोटी त्यांचं सेवन करा. म्हणजे गिळून टाका. वाटीतलं जे पाणी आहे तेही प्या. ते शक्य नसेल तर तुळशीच्या पानाचं पाणी पिऊन टाका आणि पानाला पुन्हा गरम पाण्यातून उबाळून घेऊन त्याला चहासारखं प्या. तुळशीच्या पानांना गिळूनच टाकलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. याचाच अर्थ चावून खायचे नाहीत.

का चावून खायचे नाहीत?
तुम्ही जर तुळशीचं पान चावून खाल्लं तर त्यात पारा आणि आयर्न असतो, ते निघून जाते. हे दोन्ही खनिज तुमच्या दातांना हाणी पोहोचवतात. तसच दात पिवळेही करु शकतात. तुळशीच्या पानात काही आम्ल असतात आणि आपल्या तोंडातलं वातावरण हे क्षारयुक्त असतं, त्यामुळे नियमीत खाल्ले तर ते दातांना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे तुळशीचे पान चावून खाणे टाळा.

कोणती पद्धत योग्य?
तुळशीची पानं चावून खाल्ली तर ते धोकादायक असतील तर मग त्यातून बनवलेली औषधं दातदुखीवर वापरली जातात तर ती योग्य कसं? असा प्रश्नही पडू शकतो. डॉक्टरांचं म्हणनं असंय की, तुळशीच्या पानात पारा असतो हे खरंय पण त्यानं दात टॅन होतात असही दिसतं पण त्यामुळे दातांची खूप हाणी होते असे कुठले पुरावे अजून तरी नाहीत. पण असं असलं तरीसुद्धा तुळशीची पानं गिळून खाण्याचाच डॉक्टरही सल्ला देतात.

Pune Ganeshotsav 2021 : पुण्यावर कोरोनाचं संकट, मानाच्या पाचही गणपतींचं मनोभावे स्वागत, कमी भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाची प्रतिष्ठापना

Video | फिरायला जाण्यासाठी महिला बाहेर पडली, अचानकपणे सापाचा हल्ला, थरार कॅमेऱ्यात कैद

Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,154 नवे कोरोना रुग्ण, बरे होण्याचे प्रमाण 97.5 टक्के