Blue Aadhar : निळे आधार कार्ड म्हणजे काय? कोणाला मिळते हे आधार कार्ड

| Updated on: Sep 24, 2024 | 4:23 PM

Blue aadhar card : या आधार कार्डचा रंग निळा असतो. म्हणून त्याला ब्लू आधार असेही म्हणतात. हे आधार कार्ड 5 वर्षांनंतर अपडेट करावे लागते. हे आधार कार्ड बनवण्याची आणि अपडेट करण्याची पद्धत काय आहे जाणून घ्या.

Blue Aadhar : निळे आधार कार्ड म्हणजे काय? कोणाला मिळते हे आधार कार्ड
Follow us on

भारतात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. मोठ्या व्यक्तींना जसे आधार कार्ड दिले जाते. तसेच लहान मुलांनाही अनेक ठिकाणी आधार कार्डाची गरज भासते. 2018 मध्ये, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने मुलांसाठी आधारची सुविधा सुरू केली आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे आधार कार्ड बनवले जाते. या आधार कार्डचा रंग निळा आहे. म्हणून त्याला ब्लू आधार असेही म्हणतात. सुरुवातीला हे आधार कार्ड बनवण्यासाठी जन्माचा दाखला आवश्यक होता, मात्र आता प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. आता मुलांसाठी आधार कार्ड काढण्यासाठी अर्जासोबत डिस्चार्ज स्लिप किंवा जन्म प्रमाणपत्रासह पालकांपैकी एकाच्या आधार कार्डद्वारे देखील काढता येते. जन्म प्रमाणपत्र नसतानाही तुम्ही घरबसल्या हे आधार कार्ड बनवू शकता.

5 वर्षांनंतर अपडेट करणे आवश्यक आहे

निळे आधार प्रौढ आधार कार्डपेक्षा थोडे वेगळे असते. ब्लू आधारसाठी मुलाच्या फिंगरप्रिंट स्कॅनची आवश्यकता नसते. आधार कार्डची पडताळणी करण्यासाठी पालकांपैकी एकाला त्याचे आधार कार्ड दाखवावे लागते. बाल आधार कार्डमध्ये 12 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक देखील असतो आणि तो निळ्या रंगात येतो. मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त झाल्यावर, पालकांनी ते अपडेट करावे लागते. कारण त्यानंतर ते बेकायदेशीर ठरते. 5 वर्षांनंतर, मुलाचे बायोमेट्रिक तपशील (मुलाचे छायाचित्र, बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन इ.) अपडेट करावे लागतात.

ब्लू आधार कार्ड कसे काढायचे

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्या.
  • ‘माय आधार’ टॅबवर क्लिक करा आणि ‘बुक ॲन अपॉइंटमेंट’ पर्याय निवडा.
  • ‘UIDAI द्वारे संचालित आधार सेवा केंद्रावर अपॉइंटमेंट बुक करा’ हा पर्याय निवडा.
  • तुमचे शहर निवडा आणि ‘अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा एंटर करा. ‘Get OTP’ वर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका.
  • भेटीची तारीख निवडा आणि या तारखेला आधार केंद्राला भेट द्या.
  • आधार केंद्रावर, पालकांपैकी एकाला त्यांचे आधार कार्ड आणि मुलाच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागेल.
  • मुलाचे पासपोर्ट आकाराचे फोटो जमा करावे लागेल आणि मुलाचे आधार कार्ड अर्ज भरावा लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस प्राप्त होईल.

काही दिवसांनंतर, बाल आधार कार्ड पोस्टाने पाठवले जाईल किंवा ते UIDAI वेबसाइटवरून ऑनलाइन देखील डाउनलोड केले जाऊ शकते.

वयाच्या ५ वर्षानंतर आधार कसे अपडेट करायचे

मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असेल, तेव्हा बायोमेट्रिक माहिती बाल आधारमध्ये अपडेट करावी लागते. यासाठी अपॉइंटमेंट बुक करावी लागेल. यानंतर सर्व आवश्यक कागदपत्र घेऊन तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. मुलाचा बायोमेट्रिक डेटा आधार केंद्रावर घेतला जाईल, त्यानंतर हा डेटा मुलाच्या आधार कार्डमध्ये समाविष्ट केला जाईल. ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. बायोमेट्रिक डेटा अपडेट केल्यानंतर मुलाच्या आधार क्रमांकामध्ये कोणताही बदल केला जात नाही.