तुम्हीही कूलर खरेदी करणार आहात? आधी हे 6 प्रकार पहा आणि मगच निर्णय घ्या !

| Updated on: Apr 12, 2025 | 3:40 PM

घरगुती थंडावा मिळवण्यासाठी एअर कूलर हा सर्वाधिक वापरला जाणारा पर्याय आहे. प्रत्येक कूलरची रचना आणि क्षमता वेगळी असते, त्यामुळे तुमच्या खोलीच्या आकारानुसार आणि गरजेनुसार योग्य कूलर निवडणं गरजेचं आहे. चला, पाहूया तुमच्यासाठी नेमका कोणता कूलर सर्वात योग्य ठरेल!

तुम्हीही कूलर खरेदी करणार आहात? आधी हे 6 प्रकार पहा आणि मगच निर्णय घ्या !
Follow us on

उन्हाळ्याच्या झळांपासून बचाव करण्यासाठी अनेक जण घरात थंडावा निर्माण करण्यासाठी एसी किंवा कूलरचा पर्याय निवडतात. मात्र, एसी सर्वांनाच परवडतो असं नाही, त्यामुळे बजेटमध्ये थंडावा मिळवण्यासाठी बहुतांश लोक कूलर खरेदी करतात. पण अनेकदा माहितीअभावी चुकीचा कूलर घेतला जातो, जो आपल्या गरजेनुसार योग्य ठरत नाही. त्यामुळेच, बाजारात कोणकोणते कूलर प्रकार उपलब्ध आहेत, त्यांचे उपयोग काय आहेत आणि कोणत्या परिस्थितीत कोणता कूलर अधिक फायदेशीर ठरतो, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

पर्सनल कूलर – बेडरूमसाठी बेस्ट साथी

लहान किंवा मध्यम खोल्यांसाठी सर्वोत्तम असणारा हा कूलर पोर्टेबल असतो. यामध्ये लहान वॉटर टँक असतो, त्यामुळे तो सहज एका खोलीतून दुसरीकडे नेता येतो. बेडरूमसाठी उत्तम पर्याय.

डेजर्ट कूलर – मोठ्या खोलीसाठी दमदार उपाय

डेजर्ट कूलरमध्ये मोठ्या क्षमतेचा वॉटर टँक असतो आणि हे प्रचंड शक्तिशाली पंख्यांनी सुसज्ज असतात. लिव्हिंग रूम, डायनिंग हॉल किंवा मोठ्या ऑफिससारख्या जागांमध्ये वापरासाठी योग्य.

हे सुद्धा वाचा

टॉवर कूलर – स्टायलिश आणि स्पेस सेव्हर

उंच आणि स्लीक डिझाइन असलेले टॉवर कूलर विशेषतः भाड्याच्या घरांमध्ये किंवा कमी जागेच्या खोल्यांमध्ये चांगले बसतात. हे पोर्टेबल असून, सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा उत्तम संगम आहेत.

विंडो कूलर – खिडकीतून थेट थंडावा

या प्रकारचे कूलर खिडकीत फिट होतात. बाहेरची गरम हवा आत घेतात आणि थंड हवा खोलीत फवारतात. हॉल, कॉमन एरिया किंवा ऑफिससाठी उपयुक्त पर्याय.

स्मार्ट आणि रिमोट कंट्रोल कूलर – भविष्याचा कूलर

आजकालच्या स्मार्ट युगात, रिमोट किंवा वॉइस कंट्रोलने चालणारे कूलर बाजारात आले आहेत. हे टॉवर कूलरचे आधुनिक वर्जन असून, त्यांची किंमत जरा जास्त असली तरी सुविधा अपार असतात.

एअर कूलर – सगळ्यांचं फेव्हरेट!

सर्वसामान्य घरांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा कूलर म्हणजे एअर कूलर. पाण्याच्या सहाय्याने थंड हवा निर्माण करतो आणि संपूर्ण खोलीत ती पसरवतो. सोपा, कार्यक्षम आणि बजेट फ्रेंडली.