नवी दिल्ली : साप हा जगातील सर्वात धोकादायक प्राणी आहे. जगभरात दरवर्षी 1,38,000 लोक सर्पदंशाने मरतात. आपल्या समाजात सापांबद्दल बर्याच गोष्टी बोलल्या जातात. तर सत्य काहीतरी वेगळंच आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आपण लहानपणापासूनच सापांबद्दल ऐकत आहोत, परंतु सत्य हे आहे की आपल्याला सापांबद्दल फारच कमी माहिती आहे. (Can Garudi really control snakes, How true is the matter of removing the teeth of a snake, know about it)
लहानपणी, आपण सर्वांनी गारुड्यााचा खेळ पाहिला असेल. गारुड्याच्या पुंगीच्या आवाजावर साप कसा बाहेर येऊन फुत्कारे सोडतो हे आपण पाहिले. सामान्यत: लोकांना असे वाटते की, गारुडी सापाला नियंत्रित करतात. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की, गारुडी साप नियंत्रित करू शकत नाहीत. होय, सापांना कान नसतात त्यामुळे ते गारुड्यांनी वाजवलेल्या पुंगीचा आवाज त्यांना ऐकू येत नाही. सापांना नेहमीच तरंग जाणवतात आणि त्यानुसार हालचाल करतात. म्हणून, पुंगीच्या आवाजाने गारुडी सापांना नियंत्रित करू शकत नाहीत.
आता तुम्हाला असं वाटलं असेल की पुंगी पाहिल्यानंतर साप का हालचाल करु लागतात? उत्तर अगदी सोपे आहे. पुंगी पाहिल्यावर, साप घाबरतात, त्यांना वाटते की त्यांच्यावर हल्ला केला जाईल. ज्यामुळे ते हालचाल करु लागतात. गारुड्याची पुंगी पाहून साप फक्त त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात. ते पुंगीच्या आवाजाने मंत्रमुग्ध होत नाहीत कारण त्यांना पुंगीचा आवाजच ऐकू शकत नाही. याशिवाय सापांचे दात तोडण्याविषयीही बर्याच गोष्टी सांगितल्या जातात.
तुम्ही बर्याच लोकांकडून ऐकले असेलच की गारुडी सापांचे दात काढतात आणि त्यांचे विष बाहेर काढतात. हे पूर्णपणे सत्य आहे. साप पकडल्यानंतर गारुडी त्यांचे दात काढतात आणि विष काढून विकतात. खेळ संपल्यानंतर लोकांकडून त्यांना स्पर्श करून पैसे कमावण्यासाठी गारुडी सापांचे दात काढतात. जर सापाचे दात काढले नाहीत तर त्याला स्पर्श करणाऱ्या व्यक्तींवर प्राण वाचवण्यासाठी तो हल्ला करु शकतो. (Can Garudi really control snakes, How true is the matter of removing the teeth of a snake, know about it)
राशिद खानने क्रिकेटसाठी दिलंय ‘हे’ मोठं बलिदान, मुलाखतीत केला खुलासाhttps://t.co/b3RTIGVL0j#RashidKhan | #AfganistanCricket | #Cricket
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2021
इतर बातम्या
आता पैसे काढणे महागणार, ATMमधून पैसे काढणे शुल्क, डेबिट, क्रेडिट कार्ड शुल्कात वाढ, जाणून घ्या…