मृत व्यक्तीच्या एटीएम कार्डमधून पैसे काढू शकतो का? जाणून घ्या सत्य

| Updated on: Nov 16, 2024 | 4:32 PM

डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्डच्या बाबतीत असे होत नाही, कारण यामध्ये तुम्हाला कार्ड घेऊन एटीएम मशिनमधून पैसे काढू शकता. पण तुम्हाला माहित आहे एखाद्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीने एटीएम कार्डने बँकेत जमा असलेली पूर्ण रक्कम काढणे चुकीचे आहे.

मृत व्यक्तीच्या एटीएम कार्डमधून पैसे काढू शकतो का? जाणून घ्या सत्य
Follow us on

डिजिटल इंडियामुळे आपल्या प्रत्येकाचे काम सोयीस्कर झाले आहे. यामुळे आपण सहजपणे जगभरात कुठेही व्यवहार करू शकतो. यासाठी आपले बँकेमध्ये खाते उघडलेले असणे महत्वाचं आहे. तसेच जेव्हा आपण बँकेत खाते उघडतो तेव्हा अनेक सुविधांचा लाभ आपल्याला घेता येतो. जस कि नेट बँकिंग म्हणा किंवा तुम्ही रोख रक्कम न देता समोरच्या व्यक्तीच्या खात्यात चेकबुकच्या साहाय्याने पैसे देऊ शकता.

डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्डच्या बाबतीत असे होत नाही, कारण यामध्ये तुम्हाला कार्ड घेऊन एटीएम मशिनमधून पैसे काढू शकता. पण तुम्हाला माहित आहे एखाद्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीने एटीएम कार्डने बँकेत जमा असलेली पूर्ण रक्कम काढणे चुकीचे आहे? असे करणाऱ्याला तुरुंगवास होऊ शकतो का? चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे.

– सहसा असे दिसून येते की, एखाद्याच्या कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाला की कुटुंबातील सदस्य त्याच्या एटीएममधून पैसे काढतात. कारण नियमांनुसार असे करणे बेकायदेशीर आहे, हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे ठरते. नॉमिनीलाही बँकेला न सांगता खात्यातून पैसे काढता येत नाहीत. असे करताना पकडले गेल्यास तुम्हाला शिक्षाही होऊ शकते.

– नियमानुसार, जेव्हा मृतव्यक्तीची सर्व मालमत्ता घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित केली जाईल तेव्हाच पैसे काढू शकता. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्याने ही माहिती आधी बँकेला देणे गरजेचे आहे.

– त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या बँक खात्यात नॉमिनी असेल तर त्यालाही बँकेला माहिती द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर एकापेक्षा जास्त नॉमिनी असल्यास बँकेला संमतीपत्र दाखवावे लागते, त्यानंतरच तुम्ही मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता.

– जर तुम्ही मृत व्यक्तीच्या बँक खात्याचे नॉमिनी असाल तर खात्यात जमा झालेल्या पैशांवर दावा करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्मसोबत पासबुक, अकाउंट टीडीआर, चेकबुक, डेथ सर्टिफिकेट आणि तुमचे आधार आणि पॅन कार्डही जोडावे लागेल. त्यानंतर बँक सर्व काही पडताळणी करते आणि पडताळणी योग्य ठरल्यानंतर तुम्ही मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता.

अशा रीतीने तुम्ही नियमांचे पालन करून तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर बँकेत जाऊन हि प्रक्रिया करणे गरजेचे आहे.