एक तिकीट, 8 रेल्वे अन् 56 दिवस प्रवास…ना दंड ना एक्स्ट्रा चार्ज, कसे बुक करावे हे ट्रेन तिकीट

| Updated on: Sep 15, 2024 | 10:50 AM

Circular Journey Ticket: सर्कुलर तिकीट 56 दिवस वापरु शकतात. लांब प्रवास करताना वेगवेगळ्या स्टेशनवर पुन्हा, पुन्हा तिकीट घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे तुमचा वेळही वाचणार आहे. तसेच पैसेही वाचणार आहेत. जर तुम्ही वेगवेगळ्या स्थानकावरुन तिकीट घेतले तर ते महाग पडणार आहे.

एक तिकीट, 8 रेल्वे अन् 56 दिवस प्रवास...ना दंड ना एक्स्ट्रा चार्ज, कसे बुक करावे हे ट्रेन तिकीट
railway
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

Circular Journey Ticket: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या लाखोंमध्ये नाही तर कोट्यवधीमध्ये आहे. रेल्वे प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधा देत असते. परंतु या सुविधांची माहिती अनेक वेळा प्रवाशांना नसते. भारतीय रेल्वेची अशीच एक अनोखी सुविधा आहे. त्यात एक वेळा तिकीट काढल्यावर 56 दिवस प्रवास करता येतो. रेल्वे प्रवासी एका तिकिटावर 8 वेगवेगळ्या स्थानकांवरून प्रवास करू शकतात. या कालावधीत तुम्ही अनेक गाड्यांमध्ये चढू शकता. यामुळे लांबच्या टूरवर जात असताना वेगवेगळ्या स्थानकांवरून तिकीट काढण्याची गरज नाही. यामुळे पैशांची बचत होते. या तिकिटाला सर्कुलर तिकीट म्हणतात.

असे बनवता येईल सर्कुलर तिकीट

सर्कुलर तिकीट तुम्ही सरळ काऊंटरवरुन खरेदी करु शकत नाही. त्यासाठी आधी अर्ज द्यावा लागतो. आपल्या ट्रॅव्हल रुटची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावी लागते. हे तिकीट घेताना ज्या ठिकाणावरुन प्रवास सुरु करणार त्याच ठिकाणी प्रवास पूर्ण करावा लागतो. म्हणजे मुंबई रेल्वे स्टेशनवरुन सर्कुलर तिकिटाने प्रवास सुरु केल्यास मुंबईत रेल्वे स्थानकात हा प्रवास पूर्ण करावा लागणार आहे.

असा करता येणार प्रवास

तुम्ही जर नवी दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंत सर्कुलर तिकिटाने प्रवास करत असाल तर नवी दिल्लीपासून प्रवास सुरू होईल. त्याची सांगता नवी दिल्ली येथे होईल. या दरम्यान मथुरा, मुंबई, गोवा, बेंगळुरू सिटी, म्हैसूर, बेंगळुरू, उदगमंडलम, तिरुवनंतपुरम मार्गे कन्याकुमारी येथे जाऊ शकतात. तसेच त्याच मार्गाने नवी दिल्लीला परत याल.

हे सुद्धा वाचा

सर्कुलर तिकिटासाठी टेलिस्कोपिक दर

सर्कुलर तिकीट 56 दिवस वापरु शकतात. लांब प्रवास करताना वेगवेगळ्या स्टेशनवर पुन्हा, पुन्हा तिकीट घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे तुमचा वेळही वाचणार आहे. तसेच पैसेही वाचणार आहेत. जर तुम्ही वेगवेगळ्या स्थानकावरुन तिकीट घेतले तर ते महाग पडणार आहे. सर्कुलर तिकिटासाठी टेलिस्कोपिक दर असतात, ते प्वाइंट-टू-प्वाइंट तिकीटपेक्षाही कमी असतात.