नवी दिल्ली : धार्मिक स्थळांमध्ये पूजा-अर्चा केल्यानंतर मिळणाऱ्या प्रसादामुळे प्रकृती बिघडण्याचे प्रकार आता थांबणार आहे. यापुढे भक्त मंडळी धार्मिक स्थळांच्या आवारातील प्रसाद बिनधास्त खाऊ शकतील. प्रसादाचा दर्जा योग्य आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आता सरकार पातळीवर ठोस पावले उचलली गेली आहेत. राजधानी दिल्लीमध्ये या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. अर्थात दिल्ली सरकारने याची अंबलबजावणी सुरु केली आहे. दिल्लीतील सर्व प्रमुख धार्मिक संस्थांना भारतीय खाद्य संरक्षण संस्थेकडून ‘बीएचओजी’ ( BHOG ) अर्थात ‘भोग प्रमाणपत्र’ प्राप्त करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भक्त मंडळींना यापुढे दिल्लीतील कोणत्याही धार्मिक स्थळी कुठलीही चिंता न करता प्रसाद किंवा महाप्रसादाचा लाभ घेता येईल. (Eat Bindhast Prasad at religious places now; Bhog certificate to be given for the quality of prasada)
‘भोग प्रमाणपत्र’ सर्व प्रकारच्या ‘प्रसाद’ आणि ‘महाप्रसाद’साठी लागू असेल. भक्त मंडळींना दिल्या जाणाऱ्या प्रसादाचा दर्जा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रमाणपत्राचा मुद्दा पुढे आला आहे. धार्मिक स्थळी मिळणारे अन्नपदार्थ तसेच प्रसाद कमी दर्जाचे घटक वापरून बनवले जातात, अशा अनेक तक्रारी पुढे आल्यानंतर सरकार पातळीवर प्रसाद आणि महाप्रसादाची गुणवत्ता राखण्याचा विचार झाला आहे. ‘भोग प्रमाणपत्र’ची वैधता दोन वर्षांसाठी असेल. सध्या या प्रमाणपत्राबाबत सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र महत्वाची मंदिरे, गुरुद्वाऱ तसेच इतर धार्मिक स्थळांना स्वेच्छेने या प्रमाणपत्राचे पालन करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
राजधानी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिर आणि साईबाबा मंदिराने आधीच प्रशिक्षण आणि ऑडिट पूर्ण केल्यानंतर हे भोग अर्थात बीएचओजी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. याव्यतिरिक्त अन्य धार्मिक स्थळेही ‘भोग प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाशी बोलणी करीत आहेत.
सरकारच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे मोठे प्रकरण समोर आले तर त्या प्रकरणात राज्याचा संबंधित विभाग त्या धार्मिक स्थळाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवर आणि व्यवस्थापनावर कारवाई करू शकणार आहे. त्या कारवाईनंतरही सुधारणा दिसून आली नाही, तर प्रमाणपत्र रद्देदेखील केले जाऊ शकते. तसेच पुढीलवेळी अनुपालन अहवाल सादर केल्याशिवाय नव्याने भोग प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
सर्वात आधी ऑडिट केले जाणार आहे. मंदिर किंवा अन्य धार्मिक स्थळ ‘एफएसएसएआय’द्वारा मान्यताप्राप्त त्रयस्थ पार्टीच्या एजन्सीकडून ऑडिट करून घेतात. गुणवत्तेच्या आधारे काही स्टार दिले जातात. त्यानंतर या स्थळांवर खाण्यापिण्याचे पदार्थ बनवणाऱ्या व्यक्तींना विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण ‘फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन’मार्फत (FoSTaC) दिले जाते. जर पहिल्या ऑडिटमधून समाधानकारक निष्कर्ष पुढे आले नाहीत तर दुसऱ्यांदा ऑडिट केले जाते. त्यानंतर संबंधित ‘फूड सेफ्टी कमिशनर’ अर्थात अन्न सुरक्षा आयुक्तांमार्फत सीईओंना प्रमाणपत्र जारी करण्याची शिफारस केली जाते. त्यानंतर भारतीय खाद्य संरक्षण संस्थेकडून (FSSAI ) प्रशिक्षण आणि ऑडिटच्या अहवालासोबत भोग प्रमाणपत्र जारी करण्यात येते. (Eat Bindhast Prasad at religious places now; Bhog certificate to be given for the quality of prasada)
AFMS Recruitment 2021: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांमध्ये 89 पदांवर भरती, 9 ऑगस्टपर्यंत करा अर्ज
#afmsrecruitment2021 #afmsnotification2021 #afmsgroupccivilianrecruitment2021 #IndianArmy https://t.co/pmF4rjn7yW— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2021
इतर बातम्या
रात्र झाली तरी पालकांचा शाळेत ठिय्या; महागडी पुस्तके आणि वाढीव फीविरोधात पालक आक्रमक