कोंबडीचेच नव्हे या पक्ष्यांचेही अंडं असतं आरोग्यदायी; अंड्यांचे प्रकार माहीत आहे का?

| Updated on: Nov 28, 2024 | 4:45 PM

अंडी हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. या लेखात विविध प्रकारच्या अंड्यांचे पोषणतत्त्वे आणि आरोग्य फायदे स्पष्ट करण्यात आले आहेत. कोंबडी, बदक, क्वेल, टर्की, हंस आणि इमूच्या अंड्यांमधील प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि खनिजे यांचे विश्लेषण करून त्यांच्या आरोग्यवर्धक गुणधर्मांचे वर्णन केले आहे. विभिन्न अंड्यांचा वापर करून आहारात पोषणतत्त्वांची भर पडते.

कोंबडीचेच नव्हे या पक्ष्यांचेही अंडं असतं आरोग्यदायी; अंड्यांचे प्रकार माहीत आहे का?
Follow us on

अंडी खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं असं सांगितलं जातं. पैलवान, खेळाडू आणि सेलिब्रिटीपासून अनेक बड्या उद्योजकांच्या आहारात अंडी असतातच. अंड्यात प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि इतर अनेक पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात आढळतात. हे आपल्या शरीराला ऊर्जा देतात आणि हाडे, स्नायू मजबूत करण्यास मदत करतात. अंडे खाल्ल्याने आपले शरीर अनेक आजारांपासून सुरक्षित राहते. अंड्यांचे विविध प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराचे आपल्या आरोग्यासाठी विशिष्ट फायदे आहेत. सामान्यत: आपण कोंबडीचे अंडे खातो, पण इतर प्रकारांच्या अंड्यातही आरोग्यासाठी फायदेशीर पोषणतत्त्वे असतात. उदाहरणार्थ, माशांच्या अंड्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स असतात. माशांची अंडी हृदयासाठी फायदेशीर आहेत. हंस किंवा बदकाच्या अंड्यात जास्त आयरन आणि व्हिटॅमिन D असतात. क्वेलचे अंडे अँटीऑक्सिडन्ट्सने भरपूर असतात.

अंड्यांचे विविध प्रकार आणि त्याचे फायदे:

माशांचे अंडे (Fish Eggs) :

माशांच्या अंड्यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स, व्हिटॅमिन D आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदतच होते.

बदकाचे अंडे (Duck Eggs) :

या अंड्यात आयरन, व्हिटॅमिन D, अँटीऑक्सिडन्ट्स आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स चांगल्या प्रमाणात असतात.

क्वेलचे अंडे (Quail Eggs) :

क्वेलच्या अंड्यात B कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स भरपूर प्रमाणात असतात.

टर्कीचे अंडे (Turkey Eggs) :

टर्कीच्या अंड्यात प्रोटीन भरपूर असते आणि यात कोलेस्ट्रॉल कमी असतो.

हंसाचे अंडे (Goose Eggs) :

हंसाच्या अंड्यात व्हिटॅमिन B12, आयरन, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन D चांगल्या प्रमाणात असतात.

इमूचे अंडे (Emu Eggs) :

इमूच्या अंड्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जास्त प्रमाणात असतात. ही अंडी हृदयासाठी फायद्याची असतात. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन A, B12, आयरन आणि फॉलिक ऍसिड भरपूर असतात.

शहामृगाचे  अंडे (Ostrich Eggs) :

शहामृगाच्या एका अंड्यात सुमारे 20 चिकनच्या अंड्यांइतके पोषणतत्त्व असते. यामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रमाणात असतात. त्यात आयरन, सेलेनियम आणि फास्फोरस सारखे महत्त्वाचे खनिज असतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)