‘फेव्हिकॉल’ तर कंपनीचं नाव, मग वस्तू जोडून देणाऱ्या या पांढऱ्या पदार्थाला म्हणतात तरी काय?

| Updated on: Jul 19, 2021 | 12:50 PM

आपण कधी हा विचार केला आहे का की, जर कंपनीचे नाव फेव्हिकॉल असेल, तर त्यातील पांढर्‍या रंगाच्या पदार्थ नाव काय आहे. त्याचे योग्य नाव काय आहे, हे फारच थोड्या लोकांना माहित आहे.

‘फेव्हिकॉल’ तर कंपनीचं नाव, मग वस्तू जोडून देणाऱ्या या पांढऱ्या पदार्थाला म्हणतात तरी काय?
फेव्हिकॉल
Follow us on

मुंबई : जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीला जोडण्याचा किंवा चिकटवण्याचा विषय निघतो, तेव्हा फेव्हिकॉलचे (Fevicol) नाव प्रथम क्रमांकावर येते. अगदी बॉलिवूडच्या गाण्यांमध्येही या शब्दाचा वापर केला गेला आहे. फेव्हिकॉलच्या मजबूत जोडबद्दल बरीच चर्चा आहे. फेव्हिकॉलची इतकी लोकप्रियता आहे की, लोक आता त्यातील चिकट द्रवाला अर्थाद त्या गोंदला देखील फेव्हिकॉल म्हणूनच ओळखतात. जेव्हा प्रत्येकजण एखादी गोष्ट चिकटण्याकरता थोडासा गोंद घेण्यास जातात, तेव्हा देखील ते फेव्हिकॉल द्या, असेच म्हणतात. पण, फेव्हिकॉल हे केवळ त्या कंपनीचे नाव आहे.

आपण कधी हा विचार केला आहे का की, जर कंपनीचे नाव फेव्हिकॉल असेल, तर त्यातील पांढर्‍या रंगाच्या पदार्थ नाव काय आहे. त्याचे योग्य नाव काय आहे, हे फारच थोड्या लोकांना माहित आहे. कारण बहुतेक लोकांना हा पदार्थ फक्त फेव्हिकॉल या नावाने माहित असतो. चला तर जाणून घेऊया याबद्दल…

फेव्हिकॉलबद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का?

फेव्हिकॉलचा मालक ‘पिडीलाईट’ आहे. 1959 मध्ये ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज लिमिटेड’ने पांढर्‍या, जाड आणि सुगंधी डिंकासह बाजारात प्रवेश केला. सुरुवातीला, हे उत्पादन केवळ सुतारांची गरज लक्षात ठेवून बाजारात आणले गेले. प्रथम फेव्हिकॉल 30 ग्रॅम ट्यूबमध्ये बाजारात आला होता. आता हा फेव्हिकॉल प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला आहे, जे पारंपारिक गममुळे अस्वस्थ झाले होते.

काय असतो हा पदार्थ?

तसे, फेव्हिकॉल एक सिंथेटिक रेजीन अर्थात कृत्रिम राळ आहे. या पदार्थास ‘अधेसिव्ह’ (Adhesive) म्हणतात. ही गोंदची पेस्ट आहे, जी एखादी गोष्ट चिटकवण्यासाठी वापरली जाते.

बर्‍याच गोष्टींची नावं आपल्याला माहितच नाही!

फेव्हिकॉलप्रमाणेच ‘जेसीबी’ हे देखील एका कंपनीचे नाव आहे. मग, त्या खोद काम करणाऱ्या यंत्राचे नाव काय आहे, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. वास्तविक, जे लोक याला जेसीबी म्हणतात ते चूक आहे. कारण, त्यास ‘जेसीबी’ म्हटले, तर ते एका कंपनीचे नाव आहे. पण प्रश्न असा आहे की, जेसीबी हे त्याच्या कंपनीचे नाव असेल, तर या मशीन वाहनाचे नाव काय? वास्तविक, या वाहनाचे नाव आहे ‘बॅकहो लोडर’ (Backhoe Loader). हे वाहन दोन प्रकारचे काम करते आणि तो चालवण्याची पद्धत देखील खूप वेगळी आहे. हे वाहन स्टीयरिंगऐवजी लीव्हरद्वारे हाताळले जाते.

यात एका बाजूने स्टीयरिंग असते, तर दुसरीकडे क्रेनसारखा लिव्हर असतो. या मशीनच्या एका बाजूला लोडर आहे, जो एक मोठा भाग आहे. यातून कोणतीही वस्तू उचलली जाते. जर खूप माती पडली असेल, तर ती उचलण्यासाठी याचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त, दुसर्‍या बाजूला बाजूला एक साईड बकेट असतो. त्याच वेळी, ते ‘बॅकहो’शी जोडलेले असते.

(Fevicol is the name of the company then what is this white substance name)

हेही वाचा :

PHOTO | जगातील विचित्र घरे : काही 2000 वर्ष जुन्या झाडापासून बनलेत, काही पाण्याच्या मध्यभागी दगडावर आहेत उभी, फोटो पाहून आश्चर्यचकित व्हाल

खरंच दारू पिणे कायदेशीर अधिकार आहे का?; खूप कमी लोकांना माहित आहेत या गोष्टी