मुंबई: आजकाल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा स्पर्धा परीक्षा पास करायची असेल तर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचे प्रश्न क्लीअर करणं खूप गरजेचं आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. हा भाग उत्तीर्ण झाल्याशिवाय परीक्षेत यश मिळण्याची अपेक्षा करता येत नाही. सामान्य ज्ञान म्हणजेच विविध विषयांची आणि तथ्यांची व्यापक समज आणि जागरूकता. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी अशा अनेक विषयांचा समावेश आहे. सामान्य ज्ञान महत्वाचे आहे कारण ते लोकांना जग चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, अर्थपूर्ण संभाषणात सामील होण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच अनेक सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची यादी घेऊन आलो आहोत.
प्रश्न – मुघल बादशाह अकबराचा अर्थमंत्री कोण होता?
उत्तर- राजा तोरडमल
प्रश्न- भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम भारतात कोणत्या ठिकाणी उपदेश दिला होता?
उत्तर- सारनाथ
प्रश्न – अल्लूरी सीताराम राजू हे भारतातील कोणत्या राज्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक होते?
उत्तर- आंध्र प्रदेश
प्रश्न- आझाद हिंद फौजेचे पुनरुज्जीवन कोणी केले?
उत्तर- सुभाषचंद्र बोस
प्रश्न- इंडिया हे नाव इंडस नदीवरून आले आहे, ज्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात?
उत्तर. सिंधू नदी
हिंदी महासागरात नुकत्याच बुडालेल्या चिनी जहाजाला वाचविण्यासाठी कोणत्या देशाच्या नौदलाने P8I विमान तैनात केले आहे?
उत्तर- भारत
प्रश्न – तुळशीचा रस दह्यात मिसळून प्यायल्याने काय फायदा होतो?
उत्तर – तुळशीचा रस दह्यात मिसळून प्यायल्यास वजन कमी होण्यास फायदा होतो.
प्रश्न – सुसाईड मशिन कोणत्या देशात तयार केलीये?
उत्तर – सुसाइड मशीन स्वित्झर्लंडमध्ये बनवण्यात आलीये.
प्रश्न- कोणते झाड कधीही घरात लावू नये?
उत्तर – पिंपळाचे झाड घराच्या आत लावू नये.
प्रश्न – भारतातील कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर – कर्नाटक
प्रश्न – जास्त प्रमाणात पेप्सी प्यायल्याने कोणता आजार होतो?
उत्तर – जास्त प्रमाणात पेप्सी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा धोका असतो.
प्रश्न – भारतातील कोणत्या राज्यात गव्हाची लागवड केली जात नाही?
उत्तर – तामिळनाडूत गव्हाची लागवड होत नाही.