नवी दिल्ली : कोविडबाधितांच्या आकड्यांचा आलेख दिवसागणिक उंचावत आहे. दिल्ली, मुंबईसहित देशभरात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गात वेगाने वाढ होत आहे आणि विषाणुचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन (Omicron Cases Rise) बाधितांच्या आकड्यातही भर पडत आहे. रुग्णांना उपचाराची आवश्यकता भासत आहे. तसेच संसर्गाने पातळी ओलांडल्याने अनेकांना मृत्यूने देखील गाठले आहे. कोविड उपचारासाठी पहिल्या दोन लाटेंच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत औषधांसह ऑक्सिजन पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहे. आरोग्य मंत्रालयाने निर्धारित केल्याप्रमाणे रुग्णांवर उपचार (Coronavirus Treatment) केले जात आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर कोरोनावर उपचारासाठी केंद्र सरकार रुग्णांना पाच हजारांचे अर्थसहाय्य देत असल्याचा संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा संदेश आरोग्य मंत्रालयाकडून पाठविण्यात आल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमघ्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविड फंडच्या माध्यमातून कोरोना उपचारांसाठी 5000 रुपये देत असल्याचे म्हटले आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ मथळ्यासह मेसेज व्हायरल होत आहे. पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन मेसेजद्वारे करण्यात येत आहे. योग्य पद्धतीने अर्ज केल्यानंतर केंद्र सरकारच्या कोविड फंडच्या माध्यमातून 5000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अर्ज भरण्यासाठी त्वरा करण्याचे आवाहनी करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजचे सत्यशोधन करण्यात आले आहे. केंद्र सरकारची एजन्सी पीआयबीद्वारे मेसेजचे सत्यरुप उजेडात आणले आहे. पीआयबीच्या माहितीनुसार, सध्या केंद्र सरकारने अशा प्रकारची कोणतीही योजना हाती घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्य सरकारकडून अशाप्रकारे अर्थसहाय्य पुरविले जात आहे. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार शक्य आहे. सरकारच्या उभारलेल्या कोविड केंद्रात रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहे. तपासणी ते उपचार इथपर्यंत सर्व सोयी मोफत असल्याने रुग्णांना अतिरिक्त पैसे देण्याची आवश्यकता नाही.
सरकारी धोरणे किंवा आदेशाबाबत व्हायरल होणाऱ्या बनावट बातम्यांचे खंडन करण्याचे काम पीआयबी फॅक्ट चेक द्वारे केले जाते. सोशल मीडियावर अशाप्रकारची व्हायरल माहिती समोर आल्यास 8799711259 या क्रमांकावर किंवा socialmedia@pib.gov.in ईमेल आयडी वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एक फर्जी मैसेज में दावा किया जा रहा है कि भारत सरकार के हेल्थ मंत्रालय द्वारा कोरोना फंड के तहत ₹5000 की धनराशि प्रदान की जा रही है।#PIBFactcheck
▶️ ऐसे फर्जी संदेशों को फॉरवर्ड न करें।
▶️ इस तरह की संदिग्ध वेबसाइट पर अपनी किसी भी तरह की निजी जानकारी साझा न करें। pic.twitter.com/qiAbnHlJLi
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 11, 2022
Inflation Rate | महंगाई डायन खाए जात, डिसेंबरमध्ये महागाई दराची मोठी उसळी, साडेपाच टक्क्यांच्या पार
टीसीएसचे पुन्हा ‘बायबॅक’: पाच वर्षातील विक्रमी आकडा, कमाईची बंपर संधी!
चाहूल अर्थसंकल्पाची: स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ? टॅक्स वाचणार, उत्पन्न वाढणार!