सी-विजिल ॲपमध्ये लॉग-इन करून निवडणुक आयोगाकडे आपण अनेक गोष्टींबद्दल तक्रार करू शकतो.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड समवेत देशांतील पाच राज्यात या वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (State Assembly Elections 2022) तारखा जाहीर झालेल्या आहेत. निवडणूक निपक्ष व्हावी, निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने तीन वर्षांपूर्वीच या ॲपचे लॉन्चिंग केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदार मतदानामध्ये होणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टी बद्दल तक्रार करू शकतात, तसेच मतदाराने तक्रार केल्यानंतर 100 मिनिटाच्या आत त्या तक्रारीचे निराकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुमची समस्या 100 मिनिटाच्या आत सॉल होते.
जाणून घेऊया ,एक मतदार निवडणूक आयोगाकडे कोणकोणत्या गोष्टींबद्दल तक्रार करू शकतो, त्याचबरोबर ही तक्रार कशा पद्धतीने करायची? या तक्रारीचे निवारण कसे केले जाईल तसेच आपले म्हणणे निवडणूक आयोगाकडे कसे मांडावे. अशा अनेक प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला कोणी मतदान करण्याच्या मोबदल्यात पैसे भेटवस्तू किंवा कोणत्याही प्रकारचे पद देण्याचे आमिष दाखवत असेल
आजूबाजूला कोणी एखादी व्यक्ती मतदान करण्यासाठी तुम्हाला दारूचे आमिष दाखवत असेल तर
परवानगीशिवाय एखादा व्यक्ती किंवा पक्ष कार्यकर्ता पोस्टर लावत असेल तर
कोणत्याही प्रकारचे शास्त्र दाखवून धमकावणे किंवा त्रास देणे
परवानगी शिवाय निवडणुक चिन्ह बदलणे
कोणत्याही प्रकारे पेड न्यूज दाखवणे
उमेदवाराने संपत्तीबाबत खोटी माहिती दिली असेल तर
मतदान असेल त्या दिवशी मतदारांना एका जागेवरून दुसर्या जागी नेणे
पोलिंग बूथ पासून 200 मीटरच्या अंतरात कोणताही प्रचार करणे
प्रचार बंद केलेला असून सुद्धा प्रचार सुरूच ठेवणे
धार्मिक भावनांना ठेस पोहचेल अश्या प्रकारे एखादे वक्तव्य करून लोकांमध्ये द्वेष निर्माण करणे
प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणे
जर तुम्हाला असे वाटत असेल की, निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड होत आहे, तर अशावेळी तुम्ही c-VIGIL या ॲपच्या सहाय्याने तक्रार नोंदवू शकता, यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोर (Google play store) मध्ये जाऊन c-VIGIL हे ॲप डाऊनलोड करायचं आहे. आता तुम्हाला हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुमचे नाव, पत्ता, राज्य , विधानसभा आणि पिनकोड बद्दलची माहिती समाविष्ट करण्यासाठी सांगितले जाईल. एका ओटीपीच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे तक्रार नोंदवू शकता. पहिली तक्रार फोटोच्या माध्यमातून करू शकता व दुसरी तक्रार व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता, परंतु आपण जो व्हिडिओ पाठवला आहे तो दोन मिनिटं पेक्षा जास्त नसावा. ॲप वर तक्रार केल्यानंतर तुम्हाला एक युनिक आयडी मिळेल. या आयडीच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यात कळेल की केली गेलेल्या तक्रारीवर कारवाई झाली आहे की नाही.
जर एखाद्या तक्रारदाराला असे वाटत असेल तर आपली ओळख गुप्त असावी तर असे सुद्धा या ॲपच्या माध्यमातून करता येते म्हणूनच या ॲपमध्ये एक पर्याय सुद्धा दिला गेलेला आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तक्रार करते वेळी ॲपमध्ये Anonymous असा पर्याय उपलब्ध असतो. या पर्यायाच्या माध्यमातून तक्रारदार आपली ओळख गुप्त ठेवू शकतो.
मुलींच्या शर्टला डाव्या बाजूला का असतात बटणं? जाणून घ्या यामागील इंटरेस्टिंग कारण!!
जंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रल यामध्ये काय आहे फरक, जाणून घ्या एका क्लिकवर
कधी विचार केलंय? एवढे वजनदार असूनही ढग पडत का नाही बुवा खाली? कारण इंटरेस्टिंग आहे!