मुंबई : सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काहीतरी बोलतच राहतो. कधी कुटुंबातील सदस्यांसह, कधी मित्रांसह, कधी क्लायंट किंवा ऑफिसच्या सहकाऱ्यांसमवेत… संभाषण कधीच संपत नाही. परंतु, आपण कधीही विचार केला आहे का की, आपण एका दिवसांत किती शब्द बोलता? कदाचित आपण याकडे कधीही लक्ष दिले नाही. शब्दांची शक्ती आपल्याला सर्वांनाच माहिती असे, त्याची जाणीव आपल्याल असेल. मात्र, याबद्दल सहज जाणून घेणे देखील आपल्यासाठी मनोरंजक असू शकते (How many words a person can speak in a day).
प्रत्येकजण आपापल्या वागण्यानुसार बोलतो. काही लोक कमी बोलतात, तर काहींना खूप जास्त बोलायला आवडते. लिंक्डइन लर्निंग इंस्ट्रक्टर Jeff Ansell Research मते, एखादी व्यक्ती दिवसात कमीत कमी 7000 शब्द बोलते. असेही होऊ शकते की, बरेच लोक यापेक्षा अधिक शब्द बोलतात. हे जाणून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटले असेलच!
जर, सरासरी अंदाज घेतला तर एखादी व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात 860,341,500 शब्द बोलते म्हणजे सुमारे 86 कोटी शब्द. तर, अशी कल्पना करा की, आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात 86 कोटी शब्द बोलण्यात आपली किती शक्ती खर्च केली असेल! ब्रिटीश लेखक आणि प्रसारक जिल्स ब्रॅन्डरथ यांनी आपल्या ‘द जॉय ऑफ लेक्स: हाऊ टू हॅव फन विथ 860,341,500 वर्ड्स’ (The Joy of Lex: How to Have Fun with 860,341,500 Words) या पुस्तकात ही माहिती दिली आहे. आपल्या शब्दकोशात तरी इतके शब्द आहेत का नाहीत, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल!
जर, या शब्दांची तुलना इतर गोष्टींशी केली गेली, तर कोणताही सामान्य माणूस त्याच्या आयुष्यात ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीचे 20 खंड तब्बल 14.5 वेळा वाचतो. याचा अर्थ असा आहे की 20 खंडांमध्ये लिहिलेल्या शब्दांची संख्या, एखादी व्यक्ती 14.5 वेळा बोलू शकते. जर, मानवी शब्दांची तुलना विश्वकोशाच्या 32 खंडांशी केली गेली तर त्या शब्दांमधून 19.5 पुस्तके लिहिता येतील. जर, आपण याची तुलना बायबलशी केली तर, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात किंग जेम्स बायबलमध्ये जितके शब्द आहेत, त्याच्या 1110 पट अधिक शब्द बोलतो.
(How many words a person can speak in a day)
संस्कृतमधील ‘या’ शब्दांचं विदेशी सेलिब्रिटींना वेड, जाणून घ्या नेमका अर्थ काय ?