मुंबई : स्वप्न (Drams) हा नेहमीच खूप रंजक विषय ठरला आहे. कलाकारांपासून, लेखक आणि तत्वज्ञानी ते वैज्ञानिकांपर्यंत प्रत्येकाला स्वप्नांबद्दल बोलणे आवडते. या व्यतिरिक्त तुमच्या आणि आमच्यासारख्या इतर लोकांना देखील स्वप्नाबद्दल बरेच काही जाणून घेण्यात स्वारस्य असते. बर्याच लोकांना आपण स्वप्ने का पाहतो, हे देखील जाणून घ्यायचे असते आणि सत्य हे आहे की, वैज्ञानिकांनासुद्धा या प्रश्नाचे ठोस उत्तर देता आलेले नाही. तथापि, या प्रश्नाशिवाय स्वप्नांशी संबंधित अशा बर्याच खास गोष्टी आहेत, ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.
रात्री झोपताना एखादा माणूस किती वेळ स्वप्न पाहतो, त्याचे अचूक उत्तर देणे फार कठीण आहे. तथापि, रात्री झोपेत असताना एखादी व्यक्ती किती दिवस स्वप्न पाहतो, याचा अंदाज तज्ज्ञ लावू शकतात. नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या मते, एक व्यक्ती दररोज रात्री सरासरी 4 ते 6 वेळा स्वप्न पाहते. याचाच अर्थ, आपण वर्षभरात 1460 ते 2190 वेळा स्वप्न पाहतो.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालात असे सांगितले गेले आहे की, रात्री झोपताना आपण 2 तास स्वप्न पाहू शकतो. त्यानुसार, आम्ही वर्षामध्ये 730 तास (सुमारे एक महिना) केवळ स्वप्न पाहतो. याचा सोपा अर्थ असा आहे की, एखादी व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात 6 वर्षे केवळ स्वप्ने पाहते.
स्वप्नांविषयी एक विशेष गोष्ट अशी आहे की, आपण आपल्या आयुष्यात पाहिलेल्या 90% स्वप्नांना जागे झाल्यावर विसरून जातो. झोपेच्या वेळी आपण जी स्वप्ने पाहत आहोत, त्याबद्दल नंतर आपल्याला काहीच माहिती नसते. याचा अर्थ असा आहे की, आपले स्वप्न कुठून सुरू झाले, आपल्याला त्याबद्दल काहीही आठवत नाही. तथापि, जर स्वप्न खूप सुंदर किंवा भयानक असेल तर शेवटपर्यंत लक्षात ठेवले जाते.
आपली झोप आरईएम (रॅपिड आय मूव्हमेंट) आणि एनआरईएम (नॉन-रॅपिड आय मूव्हमेंट) या दोन भागात विभागली गेली आहे. जेव्हा आपण झोपायला लागतो, तेव्हा आरईएम हा एक टप्पा सुरु होतो. या दरम्यान आपण गाढ झोप घेत नाही आणि आपले मन सतत चुळबुळ करत राहते. असे म्हणतात की, आपण केवळ गाढ झोपेच्या अवस्थेत स्वप्ने पाहतो. जेव्हा, आपण गाढ झोपेत असतो, तेव्हा त्या स्थितीस एनआरईएम म्हणतात.
(Human spends so many years of his life just dreaming Learn interesting facts about dreams)
प्रति तास 16 लाख किमी वेगाने पृथ्वीकडे येतेय विध्वंसक वादळ, शहरांतील बत्ती गुल होण्याची शक्यता
दोनपेक्षा अधिक मुले असल्यास कुटुंब गमावणार हे सरकारी लाभ, बँकांकडून कर्जही मिळणार नाही!