अनेक विवाहित लोकांचा असा विश्वास असेल की अनेकदा नवरा काही कारणास्तव आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरतो. ज्यानंतर पती-पत्नीमध्ये थोडे फार भांडण होते किंवा कधी कधी भांडण मोठ्या प्रमाणात वाढते. जेव्हा ही परिस्थिती समोर येते, तेव्हा अनेकदा पार्टनर माफी मागतो किंवा विसरायला सांगतो, तर सगळं ठीक होतं. पण अनेक ठिकाणी असे केल्याने चालत नाही. अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पतीला पत्नीचा वाढदिवस विसरण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. किंवा बायकोचा वाढदिवस विसरणे हा इथे मोठा गुन्हा आहे असे म्हणावे लागेल.
आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगतो जिथे पत्नीचा वाढदिवस विसरणे हा गुन्हा आहे. या देश कायद्यानुसार पत्नीचा वाढदिवस विसरल्याच्या गुन्ह्यासाठी आरोपी पतीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समोआ देशाबद्दल आपण बोलत आहोत, हा देश सुंदर आहे पण इथला कायदा कडक आहे. समोआमध्ये नवरा पहिल्यांदा बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याला थोडा दिलासा दिला जातो.
पण याची पुनरावृत्ती झाल्यास पती शिक्षेला बळी पडतो. दुसऱ्यांदा वाढदिवस विसरल्याने पतीवर खटला चालतो आणि त्याला दंड भरावा लागू शकतो किंवा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. तोही पाच वर्षांचा तुरुंगवास.
या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी समोआमध्ये एक विशेष पथकही आहे. प्रत्येक पती-पत्नीच्या आयुष्यात या कायद्याचे योग्य पालन होते की नाही, यावर ही टीम लक्ष ठेवते.
या विशेष पथकाव्यतिरिक्त पोलिसांनीही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. तक्रार मिळताच पोलीस विनाविलंब या प्रकरणी कारवाई करतात. महिलांना या कायद्याची जाणीव व्हावी यासाठी वेळोवेळी शिबिरे आणि मोहिमा आयोजित केल्या जातात.