नवी दिल्ली, १ सप्टेंबर २०२३ : ही स्टोरी आहे उत्तर प्रदेशची. अनिलला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. रात्रीची वेळ होती. त्यांनी फोन उचलला. रूममध्ये अंधार पाहून लाईट लावण्यास सांगण्यात आले. समोर एक युवती होती. व्हिडीओ कॉलसह बाथरूममध्ये जाण्यास सांगण्यात आलं. आता अनिल युवतीचं ऐकत होते. काही वेळानंतर कॉल बंद झाले. आता अनिलच्या फोनवर दुसरी बेल वाजली. पोलीस इनिस्पेक्टर असल्याचं सांगत होता. पोलीस ठाण्यात येण्यास सांगण्यात आलं. बदनामी नको असेल तर ३८ हजार ६४० रुपये हवेत. आता ३० हजार दे. नंतर उद्या बघू. जास्त हुशारी केल्यास उद्या ही रक्कम दुप्पट होईल, अशी धमकी आली.
दुसऱ्या दिवशी उर्वरित पैसे देण्यास उशीर झाला. अनिलच्या व्हॉट्सअपवर एक लिंक आली. त्यात रात्री मुलीने व्हिडीओ कॉलवर युवतीने रिकॉर्ड केलेला व्हिडीओ होता. तोपर्यंत अनिलच्या मोबाईलचा डाटा हॅक करण्यात आला होता. अनिलने पैशाची व्यवस्था केली आणि तो प्रचंड घाबरला होता.
पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. आता अनिल अधिकच अस्वस्थ झाला. मित्रांनी त्याला सल्ला दिला. आता तो फोन आल्यास उचलू नको. तो नंबर ब्लॉकमध्ये टाक. मित्रांनी या घटनेची माहिती एका इनिस्पेक्टरला दिली. पोलिसांत तक्रार करण्यात आली. तपास सुरू आहे. अनिल हे काल्पनिक नाव घेतले आहे.
आयपीएस डॉ. अरविंद चतुर्वेदी म्हणाले, व्हिडीओ कॉलवर ठगवले जात आहे. शहरात ही बाब सामान्य झाली आहे. या धोक्यात ज्येष्ठ नागरिकही येतात. महिला आणि पुरुषही संकटात येत आहेत.
अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल घेऊ नका. चुकून फोन उचलला तर फोन कट करा. नंबर उचलून फसलात तर मित्रांना सांगा. पैशाची मागणी केल्यास तो नंबर लगेच ब्लॉक करा. पोलिसांची मदत घ्या. असं केल्यास तुमच्या पैशांची लूट थांबवली जाऊ शकते.