जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत भारताचं स्थान 11वं आहे, मात्र जगातील सर्वात दानशूरांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
जवळपास 6,36,388 कोटींच्या संपत्तीसह मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. मात्र, मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीपेक्षा अधिक रक्कम भारतातील एका उद्योजकाने चक्क दान केलीय. या उद्योजकाचं नाव आहे टाटा (Tata Trust).
हुरुन रिसर्च आणि एडेलगिव फाऊंडेशनच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात हे समोर आलंय. मुकेश अंबानींची नेट वर्थ जवळपास 6.36 लाख कोटी आहे. दुसरीकडे टाटांनी मागील 100 वर्षांच्या काळात 7.60 लाख कोटी दान केलेत.
म्हणूनच जगातील सर्वात मोठा दानशूर व्यक्तींच्या यादीत टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी दान केलेली रक्कम टाटा समुहाच्या कंपन्यांच्या किमतीच्या 66 टक्के आहे.
2020 मध्ये 7,904 कोटी रुपये दान करून विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी दानशूरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते.