पोलादी महिला पंतप्रधान म्हणून ओळख असलेल्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची हत्या घडवून आणणाऱ्या सतवंत सिंह आणि केहर सिंह यांना आजच्या दिवशी फाशी देण्यात आली होती. सतवंत सिंह आणि बेअंत सिंह इंदिरा गांधी यांचे सुरक्षारक्षक होते 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांनी इंदिरा गांधी यांची निवास्थानी 25 गोळ्या झाडून हत्या केली होती या हत्येच्या कटात केहर सिंह सुद्धा सहभागी होता अन्य सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात बेअंत सिंह ठार झाला होता.
तत्कालीन पंजाब मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार ची सुरुवात केली होती या ऑपरेशनमुळे सतवंत सिंह बेअंत सिंह केहर सिंह नाराज झाले होते केहर सिंह याने इंदिरा गांधी यांच्यावर गोळीबार केला नव्हता मात्र तो या षड्यंत्राचा एक भाग होता बेअंत सिंहला अन्य सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीच ठार केले होते तर केहर सिंह हा कटामध्ये सहभागी असल्याचे सिद्ध झाले होते
31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी सकाळी नऊ वाजता पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर पडल्या त्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होत्या त्याच वेळेस अचानक जवळच असलेल्या बेअंत सिंह याने इंदिरा गांधी यांच्यावर त्याच्या कडील सर्विस रिवाल्वर मधून तीन गोळ्या झाडल्या आणि तो के सतवंत सिंह वर ओरडला बघतोस काय गोळ्या झाड
सतवंत सिंह यानेही त्याच्याकडील बंदुकीतून इंदिरा गांधी यांच्या दिशेने फैरी झाडल्या. इंदिरा गांधी यांना त्वरित एम्स हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले चार तासानंतर दुपारी दोन वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
गोळीबारानंतर सतवंत सिंह आणि बेअंत सिंह पळून जात असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पळून जाताना बेअंत सिंह हा गोळीबारात ठार झाला.सतवंत सिंह याला ताब्यात घेण्यात आले शीख धर्मियांसाठी पवित्र स्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात खलिस्तान वाद्यांनी घुसखोरी केली होती त्यांच्या विरोधात ऑपरेशन ब्लू स्टार राबविण्यात आले होते त्या नाराजीने या तीनही अंगरक्षकांनी इंदिरा गांधी यांना मारण्याचे षड्यंत्र रचले होते.
सतवंत सिंह आणि केहर सिंह तसेच बलवंत सिंह यांच्याविरोधात पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणात खटला दाखल करण्यात आला बलवंत सिंह याच्या विरोधात कुठलाही पुरावा न सापडल्याने त्याची मुक्तता करण्यात आली तर या हत्याकांडाच्या पाच वर्षानंतर सतवंत सिंह आणि केहर सिंह यांना 6 जानेवारी 1989 रोजी तीहार तुरुंगामध्ये फासावर लटकवण्यात आले त्यांचे मृतदेह कुटुंबियांना देण्यात आले नाही त्यांच्यावर तुरुंग प्रशासनाने अंत्यसंस्कार केले
इतर बातम्या-