मुंबई : नोकरदारांसाठी पीएफ व्याजाबाबत चांगली बातमी आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून पीएफ धारक पीएफ व्याजाची वाट पाहत होते. हे व्याज वेळोवेळी ईपीएफओकडून खात्यावर जमा होतं. या वर्षीचं व्याज जमा होणं बाकी होतं, मात्र लवकरच हे व्याजही खात्यात जमा होणार आहे. पीएफधारकांना खूप वाट पाहावी लागल्यानंतर ईपीएफओ पीएफ व्याजदराबाबत एक योजना आखून त्याची माहिती कर्मचाऱ्यांना दिलीय.
ईपीएफओकडून व्याज जमा झाल्यास जवळपास 6 कोटी ईपीएफओ ग्राहकांना याचा फायदा होईल. याआधी जुलै अखेर व्याज पीएफ खात्यात जमा होईल असं मानलं जात होतं. मात्र, तसं झालं नाही. ईपीएफओकडून 8.5 टक्के दराने ईपीएफ व्याज खात्यात जमा केले जाईल. याआधी दोन हप्त्यात व्याज जमा होईल असं सांगितलं गेलं होतं. त्यानुसार एक हप्ता जुलै अखेर आणि दुसरा डिसेंबरपर्यंत पाठवली जाईल असा अंदाज होता.
Whenever the interest will be credited, it will be accumulated and paid in full. There would be no loss of interest.
— EPFO (@socialepfo) July 14, 2021
एका पीएफ खातेधारकाने ट्विटरवर ईपीएफओला टॅग करुन ईपीएफओकडून पीएफ व्याज दर कधीपर्यंत मिळेल असा प्रश्न विचारला होता. त्यावर ईपीएफओने प्रतिसाद देत सर्वांना एक रकमी व्याज मिळेल आणि ते पीएफ खात्यात जमा होईल अशी माहिती दिली. तसेच कुणाच्याही पीएफ व्याजाचं नुकसान होणार नाही, असा विश्वासही दिला. मात्र, व्याज पीएफ खात्यात कधी जमा होणार याची नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
कोविड-19 साथीरोगानंतर ईपीएफओने मार्च 2020 मध्ये पीएफ व्याज दर आर्थिक वर्ष 2019-20 साठी 8.5 टक्के केले होते. हे ईपीएफ व्याज दर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी आहे. याआधी आर्थिक वर्ष 2018-19 साठी ईपीएफ व्याज दर 8.65 टक्के होतं. आर्थिक वर्ष 2017-18 साठी ईपीएफओ 8.55 टक्के व्याजदर देत होते.
Know about When EPFO will credit PF interest amount in your account for 2020-21