Frequent Urination Problem | वारंवार लघवी येते ? असू शकतात ‘हे’ आजार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

| Updated on: Jul 27, 2021 | 10:42 PM

काही लोकांनी लघवीशी संबंधित अनेक अडचणी असतात. प्रमाणापेक्षा जास्त आणि वारंवार लघवी होणे हा एक आजार आहे.

Frequent Urination Problem | वारंवार लघवी येते ? असू शकतात हे आजार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
frequent-urination
Follow us on

मुंबई : आपले शरीर म्हणजे एक यंत्र आहे. आपल्या शऱीरातील प्रत्येक अवयवाचे एक निश्चित काम आहे. हे सर्व अवयव जोपर्यंत सुरळीत काम करतात, तोपर्यंत आपले शरीर हे निरोगी आणि ठणठणीत असते. आपल्या शरीरात अन्नासारख्या काही गोष्टी आत येतात तर काही गोष्टी या बाहेरसुद्धा पडतात. मल, लघवी ही त्याची काही प्रातिनिधिक नावे आहेत. यामध्ये काही लोकांनी लघवीशी संबंधित अनेक अडचणी असतात. यातील सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त लघवी होणे. प्रमाणापेक्षा जास्त आणि वारंवार लघवी होणे हा एक आजार आहे. (know all about frequent urination problem disease in humans its symptoms and related diseases)

तीन लीटरपेक्षा जास्त लघवी होत असेल पोलोयूरिया नावाचा आजार ?

मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती दिवसभरात चार ते सात वेळा लघवीला जाते. हे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. तुम्ही दिवसभरात दोन लिटरपेक्षा जास्त पाणी किंवा तरल पदार्थांचे सेवन करत असाल तर तुम्ही चार ते सात वेळा लघवीला जाऊ शकता, असे निरीक्षण आहे. मात्र, यापेक्षा जास्त वेळा लघवी येत असेल तर काळजी करणे क्रमपाप्त आहे. एक व्यक्ती दिवसभरात तीन लीटरपेक्षा जास्त लघवी करत असेल तर त्याला पोलोयूरिया नावाचा आजार असू शकतो.

वारंवार लघवी येत असेल तर कोणते आजार असू शकतात ?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वारंवार लघवी येण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, लघवी वरंवार येत असेल तर ते खालील आजाराचे लक्षणं असू शकतात.

1) प्रोस्टेटची वाढ

2) किडनी किंवा युरेट्रिक स्टोन

3) युरिनरी ट्रॅक ईन्फेक्शन

4) डायबिटीज

4) अतिसक्रिय ब्लॅडर

तसेच एंग्झायटी, स्ट्रोक, ब्रेन किंवा नर्व्हस सिस्टिमशी संबंधित आजार, पेल्विक भागात ट्यूमर, किंवा लैंगिक आजारामुळेसुद्धा वारंवार लघवी येऊ शकते.

डॉक्टरांना वेळेवर सांगणे गरजेचे

दरम्यान, प्रमाणापेक्षा जास्त लघवी येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नये असे डॉक्टरांचे मत आहे. कारण अशा प्रकारच्या आजाराविषयी बोलताना लोकांना संकोच वाटतो. मात्र, कोणताही संकोच न करता या अडचणी डॉक्टरांना वेळेवर सांगणे गरजेचे आहे. वारंवार लघवीची अडचण वेळीच डॉक्टरांना सांगितली तर योग्य व्यायाम किंवा उपचार घेऊन हा आजार ठीक करता येऊ शकतो.

 

(टीपः कोणताही उपचार घेण्याचा विचार करत असाल तर डॉक्टरांना भेटा. डॉक्टरशी वरील लक्षणे, आजार याविषयी सविस्तर चर्चा करा. माहिती पडताळून पाहा)

इतर बातम्या :

Health Tips : ‘या’ 4 सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक, तंदुरुस्त राहायचे असेल तर आजच त्यांना निरोप द्या!

Weight Loss: पोटाच्या चरबीचे प्रकार किती?; जाणून घ्या पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय!

Health Tips : जास्त प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक, कसे ते जाणून घ्या!

(know all about frequent urination problem disease in humans its symptoms and related diseases)