ही परंपरा टिडोंग लोक जपत आहेत. टिडोंग हे एक अशा लोकांचा समूह आहे जो समूह बोर्नियोच्या पूर्वोत्तर क्षेत्राशी जोडला गेलेला आहे.प्रत्येक शहर, प्रत्येक राज्य,प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्म पंथ परंपरा (Weird Rituals) आपल्याला पाहायला मिळतात आणि काळानुसार या परंपरेमध्ये बद्दल सुद्धा झालेले आहेत. अंतिम संस्कार आणि लग्न समारंभ यांच्या परंपरा (Wedding Rituals) पाहताना अनेकदा वेगळेपण आपल्याला जाणवते.या सर्वांमध्ये ज्या काही आदिवासी लोकांच्या जमाती आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला आगळ्यावेगळ्या परंपरा आजही पाहायला मिळतात. या परंपरेबद्दल अनेकदा तुम्ही इंटरनेटवर वाचलेच असेल. या जमातीतील अनेक परंपरा आपल्याला हैराण करणारे असतात. या सगळ्या परंपरा ऐकून वाचून अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि शेवटी या सगळ्या परंपरा ही मंडळी जपतात तरी कसे असा चिंता दर्शवणारा प्रश्न निर्माण होतो. ते अगदी खरंच आहे आणि ही मंडळी अगदी तितक्याच जोमाने आपल्या पूर्वजांनी चालवलेल्या परंपरेचा आजही तितक्याच गौरवने आदर सन्मान करत आहात आहेत. अशीच एक परंपरा नॉर्थर्न ब्रोन (Northern Borne) येथील लोकांमध्ये लोकप्रिय आहे त्याबद्दल आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत…
ही परंपरा लग्न झाल्यानंतर केली जाते ,ज्यामध्ये लग्न झाल्यावर वैवाहिक जोडपे यांच्यावर काही प्रतिबंध लावले जातात आणि हे प्रतिबंध हे खरंच थक्क करणारे आहेत, अशातच आपण आधी जाणून घेऊया की या प्रजातीतील लोक असे नेमके का करतात ? नेमके असे काय कारण आहे की ही परंपरा जपली जात आहे. तसेच ही परंपरा जपत असताना या परंपरेचे काही विशिष्ट असे नियम आहेत आणि या नियमाचे प्रत्येकाला पालन करणे अनिवार्य सुद्धा आहेत. जर ही परंपरा आपल्याकडे जपायची झाल्यास किंवा या परंपरेचे आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न जर आपण केला तर भविष्यात आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे म्हणूनच क्षणाचाही विचार न करता आज आपण या लेखांमध्ये या परंपरेविषयी जोडल्या गेलेल्या अनेक माहितीबद्दल संक्षिप्त स्वरूपामध्ये जाणून घ्या..
या ठिकाणी जपली जाते ही परंपरा
ही परंपरा टिडोंग लोक आजही जपत आहेत.टिडोंग हे एक अशा लोकांचा समूह आहे जो समूह बोर्नियोच्या पूर्वोत्तर क्षेत्राशी जोडला गेलेला आहे. हे लोक इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशांच्या सीमेवर राहणारे मंडळी आहेत. टिडोंग नाव हे एक तारकान भाषेचा शब्द आहे, ज्याचा अर्थ पहाडी लोक असा होतो. या जमातीतील लोक अधिकतर शेतकरी आहेत आणि जे मासे पालन करून सुद्धा आपला उदरनिर्वाह भागवतात. या जमाती मध्ये आगळीवेगळी परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. या परंपरेमध्ये लग्न झालेल्या जोडप्यांवर काही प्रतिबंध लावले जातात आणि ही परंपरा त्या जोडप्यांना जपणं अनिवार्य आहे आणि या परंपरेचे नियम सुद्धा पालन करणे गरजेचे मानले जाते. ही परंपरा जरी पूर्वापार चालत आली असली तरी ती नैसर्गिक नियमाविरुद्ध आहे.
नेमकी काय आहे परंपरा
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक विदेशी वेबसाईटच्या रिपोर्टनुसार जर आपण या परंपरेबद्दल काही बोलायचे झाल्यास या जमातीमध्ये लग्न झाल्यानंतर जे नवविवाहीत जोडपे असते त्यांना एका खोलीमध्ये नेऊन त्यांना त्या खोलीमध्ये कोंडून ठेवले जाते. लग्न झाल्यानंतर दोघांनाही पुढील तीन दिवस याच खोलीमध्ये राहावे लागते. या खोलीमध्ये राहताना त्यांना विशेष ज्या काही अटी असतात त्या अटी पाळाव्या लागतात त्याच बरोबर एक महत्त्वपूर्ण अट असते ती म्हणजे हे नवविवाहित जोडपं आहे त्यांना पुढील तीन दिवसांपर्यंत बाथरूमला जाण्यास मनाई केली जाते याचाच अर्थ लग्न झाल्यानंतर पुढील तीन दिवस वॉशरूम ला जाण्यास मज्जाव केला जातो. या भयंकर परंपरामुळे त्यांना त्यांच्या सकाळच्या प्रातर्विधी सुद्धा करता येत नाही.
हो अगदी खरे आहे ,तुम्ही जे वाचत आहात ते सत्य आहे. तीन दिवसापर्यंत त्यांना ना लघवीला जाता येत ना संडास करायला जाता येत नाही तसेच त्यांना या तीन दिवसात अंघोळ करण्यास सुद्धा मनाई केली जाते. आता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की तीन दिवस कोणतेही प्रातविधी न करता एखादा मनुष्य कसा काय राहू शकतो? परंतु या जमातीतील लोकांना ही परंपरा जपावी लागते आणि या परंपरेचा भाग म्हणून या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये या दोन्ही जोडप्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय केली जाते व खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष सुद्धा दिले जाते तसेच त्यांना जास्त प्रमाणामध्ये खाण्याचे पदार्थ सुद्धा दिली जात नाही जेणेकरून त्यांना पुढील तीन दिवस कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते. जर एखाद्या वेळेस जास्त एमर्जन्सी असेल तर अशा वेळी त्यांना सहन करावीच लागते. एवढेच नाही तर या लोकांना करिता एक सुपरवायझर सुद्धा नेमलेला असतो जो यांच्यावर विशेष लक्ष ठेवतो ,जेणेकरून हे विवाहित जोडपे बाथरूम चा वापर करत नाही ना यावर बारीक लक्ष ठेवत असतो. यासाठीच त्यांच्या कुटुंबातील लोक या दोन्ही जोडप्यावर विशेष लक्ष ठेवून असतात.
परंपरेमागील काय आहे कारण
असे मानले जाते की मान्यतेनुसार जर ही परंपरा एखाद्या जोडप्याने व्यवस्थितरित्या पार पाडली तर त्यांचे पुढील वैवाहिक जीवन सुखाने पार पडते आणि त्यांचे वैवाहिक जीवन कोणत्याही अडथळ्याशिवाय नेहमी आनंदात राहते त्यांचा संसार सुखाने सुरू राहतो. त्याचबरोबर असेसुद्धा म्हटले जाते की,जर ही परंपरा या जोडप्याने व्यवस्थित पार पाडली नाही तर भविष्यात या दोघांपैकी एकाचा मृत्यू निश्चित होऊ शकतो. म्हणूनच अशा वेळी विवाह संकट संस्कारांपासून तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणी पासून सुटका मिळविण्यासाठी प्रत्येक जोडपे ही परंपरा अगदी मन लावून करत असतात. जेव्हा एखादे जोडपे ही परंपरा व्यवस्थितरीत्या पार पाडण्यास यशस्वी ठरतात अशावेळी हे यश मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो. जरी या परंपरेबद्दल आपण काही चांगले किंवा वाईट बोलत असलो तरी ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे आणि या जमातीतील लोक या परंपरेला अतिशय आनंदाने सामोरे जात आहेत.
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली