जगभरातील अनेक लोकांसाठी पाळीव प्राणी हा कुटुंबाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकांना प्राणी पाळण्याची आवड असते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायलाही त्यांना आवडतं. इतकंच काय तर त्यांची काळजी घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. पण कुणी कीटक पाळून भरपूर पैसे खर्च करेल काय? स्टॅग बीटलची किंमत इतकी जास्त आहे की त्या पैशातून तुम्ही लक्झरी कार किंवा आलिशान घर खरेदी करू शकता. यावर तुमचा विश्वास बसत नसला तरी ते अगदी खरं आहे.
खरं तर आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या किड्याची किंमत लाखात नाही तर कोट्यवधींमध्ये आहे. म्हणजे जर तुमच्याकडे हे कीटक असेल तर तुम्ही काहीही न करता करोडपती बनू शकता. IndiaTimes.com प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या किटकाची किंमत महागडी कार किंवा महागड्या फ्लॅटपेक्षा जास्त आहे. स्टॅग बीटल हा जगातील सर्वात दुर्मिळ प्रजातीचा प्राणी आहे, ज्याचा आकार केवळ 2 ते 3 इंच आहे. स्टॅग बीटल ही पृथ्वीवरील सर्वात लहान विचित्र आणि दुर्मिळ प्रजातींपैकी एक आहे.
असे विचित्र कीटक पाळणारे जगात फार कमी लोक आहेत, पण जेव्हा एखाद्या किटकाची किंमत एक कोटी रुपये असेल, तेव्हा कदाचित कोणताही माणूस तो सांभाळायला तयार होत असेल. स्टॅग बीटल हा देखील असाच एक कीटक आहे जो लोक पाळतात, हा पृथ्वीवर आढळणारा सर्वात मोठा बीटल आहे, जो सुमारे 8 सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतो. ते विकत घेण्यासाठी लोक एक कोटीपर्यंत पैसे द्यायला तयार आहेत. या किटकापासून अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात.
बहुतेक स्टॅग बीटल मोठे झाल्यावर काहीच दिवस जगतात, हिवाळ्यात बऱ्याच स्टॅग बीटलचा मृत्यू होतो. काही जण कंपोस्टच्या ढिगाऱ्यासारखे इतरत्र चांगले आणि उबदार राहिले तर जगू शकतात. स्टॅग बीटलचे दीर्घ आयुष्य चक्र असते, जे अंड्यापासून प्रौढत्वापर्यंत सुमारे 7 वर्षे टिकते.