मुंबई: आपण लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकतो, पण जेव्हा आपण त्या गोष्टींसह मोठे होतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचे सत्य जाणून घ्यावेसे वाटते. आपण लहानपणापासून जे ऐकत आलो आहोत, त्यात अनेक गोष्टी खोट्या ठरतात, तर कधी काही गोष्टी खऱ्या असतात. एखादी शिकवलेली, ऐकलेली गोष्ट पूर्णपणे खोटी असू शकत नाही का? आज आपण अशाच ऐकलेल्या गोष्टीबद्दल ऐकणार आहोत, ज्यासाठी तुम्ही लहानपणी खूप बोलणी खाल्ली असतील.
लहान असताना अनेक गोष्टींसाठी आपल्याला बोलणी बसायची. विशेषत: घरात चप्पल उलटी ठेवली तर त्यामुळे अनेक गोष्टी ऐकायला लागायच्या, त्या म्हणजे घरात चप्पल आणि बूट उलटे ठेवायचे. आपल्या घरातील वडीलधारी व्यक्ती विशेषतः आपली आजी, आपले आजोबा यावरून आपल्यला फार बोलायचे आठवतंय? वडीलधाऱ्यांनी अडवल्यावर आपण लगेच चप्पल सरळ करायचो. पण तुम्हाला माहित आहे का घरात चप्पल उलटी ठेवल्यावर नेमकं काय होतं? त्याने खरंच काही वाईट होतं का?
उलटा बूट किंवा चप्पल दिसली तर लगेच सरळ करा, अन्यथा लक्ष्मी नाराज होते आणि पैशाचे नुकसान होते, असे सांगितले जायचे. याशिवाय घरातील सकारात्मकता संपुष्टात येऊन घरातील वातावरणात अशांतता पसरते असंही आपल्याला ऐकवलं जायचं. यामागे कोणतेही वैज्ञानिक तथ्य नसले तरी केवळ लोकच यावर विश्वास ठेवतात.
तसं पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की, हे सगळं घरातल्या धार्मिक श्रद्धेमुळे बोललं गेलं होतं. पण याचं एक कारण म्हणजे चप्पल उलटी ठेवली तर घर चांगलं दिसणार नाही. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला खूप त्रास होतो. त्यामुळे आपण चप्पल आणि शूज सरळ बाजूने आणि योग्य ठिकाणी ठेवले पाहिजेत असा यामागचा हेतू असायचा. यामागे कोणतीही अंधश्रद्धा ठेवायचं कारण नाही. आपल्या चप्पल उलटी ठेवल्याने कुणालाही त्याचा त्रास नको इतकाच हेतू यामागे असायचा.