मुघलांचे सैन्य सर्वात ताकतवान, तरीही नेपाळमध्ये का शिरू शकले नाही मुघल?

| Updated on: Aug 18, 2023 | 9:24 PM

मुघलांच्या काळात नेपाळला व्यावसायिक महत्त्व होते. परंतु, भौगोलिक स्थिती मजबूत होती.

मुघलांचे सैन्य सर्वात ताकतवान, तरीही नेपाळमध्ये का शिरू शकले नाही मुघल?
Follow us on

नवी दिल्ली : मुघल साम्राज्याची स्थापना बाबर यांनी केली. परंतु, अकबरच्या शासनकाळात मुघल साम्राज्याचा विस्तार झाला. भारतात अकबराने मुघल साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर सर्वात जास्त विस्तार झाला होत औरंगजेबाच्या काळात. औरंगजेबाच्या काळात सैन्य जिथं राहत तिथ यश मिळत असे. कोणताही किल्ला ते सहज जिंकत असतं. संबंधित राजाला करार करावा लागत असे. काबूलपासून ते कावेरी घाटापर्यंत आणि गुजरातपासून बंगालपर्यंत मुघलांचे साम्राज्य होते. परंतु, एक असा परिसर होता तिथं जाण्याची ताकत मुघलांमध्ये नव्हती. तो प्रदेश म्हणजे नेपाळ. मुघलांनी नेपाळ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अकबर असो की, औरंगजेब त्यांना नेपाळला आपल्या ताब्यात घेता आले नाही. इतिहासकार याची वेगवेगळी कारणं सांगतात. परंतु, सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे नैसर्गिक देणं.

नेपाळची भौगोलिक स्थिती मजबूत

मुघलांच्या काळात नेपाळला व्यावसायिक महत्त्व होते. परंतु, भौगोलिक स्थिती मजबूत होती. नेपाळमधील उंच पर्वत, पहाडी भाग, नैसर्गिक किल्ला यामुळे मजबुती कायम होती. मुघल सैन्यात घोडे, उंट आणि हत्ती होते. याशिवाय थंडीही खूप होती. मुघलांच्या आधी काही जणांनी नेपाळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनाही या समस्यांचा सामना करावा लागला.

मुघल सैन्य सर्वात शक्तिशाली

अकबरपासून तर औरंगजेबापर्यंत मुघल सैन्य ताकतवार होते. मनुची यांनी लिहिले की, मुघलच नव्हे तर तुर्की, भारतीय, ईरानी आणि अफगाणी यांनीही नेपाळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण, गौरखा सैनिकांनी त्यांना परत पाठवले.

नेपाळचे व्यापारिक महत्त्व

मुघल नेहमी आपला फायदा पाहत होते. जिथं संपत्ती मिळेत तिथं मुघल कब्जा करत होते. नेपाळचे व्यापारिक महत्त्व होते. पण, मुघल नेपाळ ताब्यात घेण्यात यशस्वी होऊ शकले नाही.

बंगाली शासकही अयशस्वी

नेपाळवर हल्ले झाले. पण, हल्लेखोरांना यश मिळालं नाही. १३४९ साली बंगालचे शम्सुद्दी इलियास शाहने नेपाळवर हल्ला केला होता. काठमांडूपर्यंत पोहचले होते. परंतु,त्यांना माघार घ्यावी लागली. बंगाल राज्यकर्ता सुल्तान मीर कासीमनेही नेपाळवर हल्ला केला होता. परंतु, गोरखांनी त्यांनाही परतवलं.