भारतीय सैन्यात फक्त भारतीयच नाहीत, या देशाचे लोकं ही होऊ शकतात भरती

| Updated on: Nov 26, 2024 | 4:15 PM

भारतीय सैन्य जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. भारतीय सैन्यात सुमारे 14 लाख सैनिक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, भारत आपल्या सैन्यात शेजारी देशांच्या नागरिकांनाही स्थान देतो. कोणत्या देशातील लोकं भारतीय सैन्यात भरती होऊ शकतात? जाणून घ्या.

भारतीय सैन्यात फक्त भारतीयच नाहीत, या देशाचे लोकं ही होऊ शकतात भरती
Follow us on

भारतीय सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. भारतीय सैन्यात सुमारे 14 लाख सक्रिय सैनिक आहेत. भारतीय सैन्यात प्रामुख्याने भारतीय सैनिकांची संख्या अधिक आहे. जगातील सर्वोच्च सीमेचे (सियाचीन ग्लेशियर) रक्षण करणे असो किंवा मग अतिशय उष्ण ठिकाणी सीमेचे रक्षण करण्याची गरज असेल. भारतीय सैन्याने नेहमीच आपले सामर्थ्य आणि अदम्य धैर्य दाखवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, भारत आपल्या सैन्यात शेजारी देशांच्या नागरिकांनाही स्थान देतो. कोणत्या देशातील लोकं भारतीय सैन्यात भरती होऊ शकतात? जाणून घेऊयात.

गोरखा रेजिमेंट

भारतीय सैनिकांमध्ये नेपाळी गोरखा आणि तिबेटी सैनिकांची देखील भरती केली जाते. भारतीय सैन्यात या दोन देशांच्या सैनिकांच्या नावावर स्वतंत्र रेजिमेंट देखील आहे. गोरखा रेजिमेंट आणि तिबेटी सैनिकांचे विशेष पथक भारतीय सैन्यात कार्यरत आहे.

भूतान

नेपाळी आणि तिबेट प्रमाणेच भूतानचे लोकंही भारतीय सैन्यात भरती होऊ शकतात. त्यासाठी त्यांना फक्त भूतानचे नागरिक असणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांना देखील भारतीय सैन्यात भरती होण्याची संधी मिळते.

भारतीय वंशाचे लोकं

पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, केनिया, थायलंड, युगांडा, टांझानिया, झांबिया, मलावी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, इथिओपिया आणि व्हिएतनाम यांसारख्या देशांत विविध कारणांमुळे यापूर्वी स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांनाही भारतीय सैन्यात भरती होता येते.

अनेक धर्माचे लोकं

सीमा ओलांडून जर भारतीय सैन्यात भरती केली जात असेल तर मग धर्माच्या बाबतीत ही भेदभाव केला जात नाही. भारतीय लष्कर भारतीय सैन्यात हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, जैन, पारशी इत्यादी विविध धर्माचे लोकं भरती करतात.

या देशाच्या नागरिकांना पूर्णपणे बंदी

आता असे कोणते देश आहेत ज्यांच्या नागरिकांना भारतीय सैन्यात भरती होण्यास पूर्णपणे बंदी आहे. यामागचं कारण संरक्षण, राजकीय, द्विपक्षीय संबंध इत्यादी गोष्टी आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, चीन, अफगाणिस्तान, श्रीलंका, युरोप, अमेरिका, आफ्रिका इत्यादी देशाच्या नागरिकांना भारतीय सैन्यात सहभागी होता येत नाही.