आज महिला समुद्रापासून अंतराळापर्यंत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. जगातल्या या गोष्टींखेरीज श्रद्धा आणि चालीरितींचा विचार केला तर स्त्री-पुरुष समानतेची चर्चा निरर्थक वाटते. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये आजही काही प्रथा सुरू आहेत. उदाहरणार्थ, काही ठिकाणी महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे. जपानमध्ये अशी एक जागा आहे जिथे महिलांना जाण्यास मनाई आहे.
ओकिनोशिमा बेटाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. 700 चौरस मीटरमध्ये पसरलेले हे बेट चौथ्या ते नवव्या शतकापर्यंत कोरियन द्वीपकल्प आणि चीन यांच्यातील व्यापाराचे केंद्र होते असे म्हटले जाते. या बेटाला पवित्र स्थळाचा दर्जा मिळाला आहे. येथे महिलांना येण्याची परवानगी नाही. येथे शिंटो धर्माच्या परंपरा आजही पाळल्या जातात.
या बेटावर 17 व्या शतकात बांधलेले एक मंदिर आहे. मान्यतेनुसार येथे खलाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जायची. इथे पूजादेखील अत्यंत खास पद्धतीने केली जाते. इथे पुरुषही येतात तेव्हा एक प्रथा पाळली जाते. असे म्हटले जाते की, या बेटावर जाण्यापूर्वी पुरुषांना नग्न पणे आंघोळ करावी लागते. इथले नियम इतके कडक आहेत की वर्षभरात फक्त 200 माणसं या बेटाला भेट देऊ शकतात. याशिवाय त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ, पुरुष इथून काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत किंवा त्यांचा अनुभव कोणाला सांगू शकत नाहीत.
जुन्या मान्यतेनुसार महिलांना येथे येण्यास मनाई आहे कारण हे बेट सुरुवातीपासूनच धोकादायक मानले गेले आहे. म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना येथे येऊ दिले जात नाही. मंदिराचे एक महंत म्हणतात की, हजारो वर्षांची प्रथा बदलता येणार नाही. म्हणजे स्त्रिया इथे न येण्याचं आणखी एक कारण म्हणजे इथली प्रथा, ज्यात पुरुष इथे नग्न फिरतात.