Indian Railways : भारतामध्ये प्रत्येक दिवशी हजारापेक्षा जास्त प्रवासी रेल्वेमधून प्रवास करत असतात आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेद्वारे (Indian Railways) अनेक वेगवेगळे पावले उचलली जातात. जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे नेहमी तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करत असते जेणे करून प्रवाशांना त्यांच्या अंतिम स्थानकापर्यंत पोहोचेपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेत असते. अनेक जण रेल्वेमध्ये प्रवास करत असताना एक तक्रार वारंवार करत असतात ती म्हणजे रेल्वेमध्ये असणारी अस्वच्छता. रेल्वे असू दे किंवा रेल्वे स्टेशनवर (Railway station) असू दे या दोन्ही जागेवर भरपूर प्रमाणामध्ये अस्वच्छता पाहायला मिळते आणि याचे कारण काही प्रवासी किंवा लोक असतात. काही लोक असे असतात की ते रेल्वे स्टेशन वर एखादे खाद्यपदार्थाचे रॅपर ,कचरा पाण्याची बॉटल तसेच स्टेशन वर फेकून देतात आणि अशा कृत्यांमुळे अस्वच्छता पसरते. परंतु आता जर एखाद्याने रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता पसरवण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळी तुमच्यावर योग्य ती कारवाई (Strict action) सुद्धा केली जाऊ शकते.
रेल्वे स्टेशनवर अस्वच्छता पसरवणाऱ्या लोकांच्या विरोधात रेल्वेचे एनजीटी म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (National Green Tribunal) ने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे म्हणूनच जर एखादी व्यक्ती अस्वच्छता पसरवताना पकडली गेली तर त्याला आता नव्या नियमानुसार जेल देखील होऊ शकते. खरेतर रेल्वेच्या सफाई बद्दल नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने एक आदेश दिला आहे. त्यानंतर आयआरसीटीसीने या प्रकरणाबद्दल सर्व रेलवे स्टेशन प्रभारी अधिकारी यांना एक नोटीस पाठवली आहे . या नोटीसनुसार, प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ठेवण्याबाबत आपले योगदान द्यावे लागेल तसेच सर्व लोकांना आपल्या स्तरावर आपण जे काही पदार्थ खाऊ त्यानंतर जो कचरा शिल्लक राहील, तो कचरा कचरा कुंडीत फेकणे बंधनकारक असेल. तसेच अनेकदा पाहिले जाते की रेल्वेच्या रुळावर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कचरा पडलेला पाहायला मिळतो. रेल्वे रुळावर अस्वच्छता पसरवू नये याबद्दल प्रवाशांना सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. अनेकदा रॅपर रेल्वेच्या चाकांना चिटकल्यामुळे देखील अपघात घडण्याची शक्यता असते.
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (NGT) यांच्या आदेशानुसार जर एखादा प्रवासी रेल्वे स्टेशनवर अस्वच्छता पसरवताना दिसल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाईल, एवढेच नाही तर अशा परिस्थितीत प्रवाशांना जेल मध्ये सुद्धा जावे लागेल. सध्या अशा प्रकारच्या घटना घडल्यास फक्त प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात येत आहे, परंतु यापुढे असे केले जाणार नाही अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून याबद्दल देखरेख करण्यासाठी फ्लाइंग स्क्वायड नावाचे पथक सुद्धा तैनात करण्यात येणार आहे, त्याच दरम्यान अधिकाऱ्यांची जबाबदारी राहील की ते रेल्वे स्टेशनवर वरील स्वच्छतेबद्दल आवश्यक ती व्यवस्था करतील.
सोशल मीडियावर Reels हिरोंचा डंका, मनोरंजनासोबत पैसे कमावण्याचा काय आहे फंडा? जाणून घ्या!
Air Indiaचे नाव 75 वर्षापूर्वी ठेवले गेले, पण यामागेही आहे इंटरेस्टिंग कारण! जाणून घ्या रंजक कहाणी