मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. आता राज कुंद्राला रिमांडवर पाठवायचे की, जामीन द्यावा, हा निर्णय कोर्टावर आहे. अशा प्रकरणांमध्ये, बहुतेक आरोपींविरूद्ध आयटी कायदा आणि भारतीय दंड संहिताच्या (आयपीसी) कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जातात. कोर्टाने राज कुंद्राला दोषी ठरवले, तर त्याला किती वर्षे तुरूंगात घालवावी लागतील आणि कायदा काय, हे जाणून घेऊया.
आपल्या देशात पोर्नोग्राफी आणि अश्लील सामग्रीसंबंधी कायदा खूप कठोर आहे. इंटरनेटचा वेगाने प्रसार झाल्यानंतर आयटी कायद्यात देखील सुधारणा करण्यात आली. जेणेकरून सध्याच्या काळात अशा प्रकरणांमध्ये दोषींना सर्वात कठोर शिक्षा मिळू शकेल.
इंटरनेटच्या युगात पोर्नोग्राफीचा व्यवसाय प्रचंड वाढला आहे. नग्न फोटो, व्हिडीओ, मजकूर, ऑडिओ यासारख्या साहित्यांच्या मदतीने अश्लीलतेच्या व्यवसायाचा विस्तार झपाट्याने होत आहे. अशाप्रकारची सामग्री इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करणे, इतरांना पाठवणे किंवा इतरांमार्फत ते प्रकाशित करणे यासाठी अँटी-पोर्नोग्राफी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.
इतरांचे अश्लील व्हिडीओ बनवणे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इतरांना ते उपलब्ध करुन देणे हे अश्लीलताविरोधी कायद्याच्या कार्यक्षेत्रात येते. तसेच, हा कायदा बेकायदेशीर किंवा संमतीशिवाय कोणालाही अश्लील सामग्री पाठवणाऱ्यांना लागू आहे. अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा पाठवणे बेकायदेशीर आहे. तथापि, ते पाहण्यावर, ऐकण्यावर आणि वाचण्यावर कोणतीही बंदी नाही. परंतु, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे देखील बेकायदेशीर आहे. असे करणार्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
अश्लीलताविरोधी कायद्या अंतर्गत येणार्या प्रकरणांमध्ये आयटी कायदा 2008च्या कलम 67 (अ) आणि आयपीसीच्या कलम 292, 293, 294, 500, 506 व 509 नुसार शिक्षेची तरतूद आहे. पहिल्या गुन्ह्यात गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार 5 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पण, अशा गुन्ह्यात दुसऱ्यांदा पकडल्यास तुरुंगवासाची शिक्षा सात वर्षांपर्यंत वाढू शकते.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. ब्रिटनमध्ये राहणारे राज कुंद्रा आणि त्याचा भाऊ यांनी मिळून केनरीन नावाची कंपनी स्थापन केली. या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.
(Raj Kundra arrested in obscene film case will be punished if found guilty Learn about this law)
संबंधित बातम्या
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक, कारण काय?