मुंबई : जेव्हा तुम्ही महामार्गावरून प्रवास करता, तेव्हा रस्त्याच्या कडेला असे काही दगड तुम्ही पाहिले असतील ज्यावर रस्त्याच्या अंतराविषयी लिहिलेले असते. या दगडांना ‘माईल स्टोन’ अर्थात ‘मैलाचा दगड’ म्हणतात. कधी हे दगड पिवळ्या रंगात दिसतात तर कधी हिरव्या, कधी काळा आणि कधी लाल रंगात… हे दगड वेगवेगळ्या रंगाचे का आहेत हे जाणून घेण्याचा आपण कधीही प्रयत्न केला आहे? वास्तविक, त्यांच्या वेगवेगळ्या रंगात बर्याच प्रकारची माहिती दडलेली असते. भारताचे रस्ते जाळे सुमारे 56 लाख किमी आहे. हा संपूर्ण प्रवास वेगवेगळ्या प्रकारात विभागला गेला आहे. जो राष्ट्रीय महामार्ग, प्रादेशिक महामार्ग आणि ग्रामीण रस्ते यामध्ये विभाजित करण्यात आला आहे (Red, blue, white, orange, green Know the meaning of milestone colour).
भारतातील राष्ट्रीय महामार्ग एका राज्यातून अनेक राज्यांत विस्तारतात. हे महामार्ग शहरांना इतर राज्यांशी जोडतात. 2015-2016च्या नोंदीनुसार भारतातील राष्ट्रीय महामार्ग 1.01 लाख किमीपर्यंत पसरलेले आहेत. जर आपल्याला रस्त्याच्या कडेला पिवळ्या रंगाचा मैलाचा दगड दिसला, तर याचा अर्थ असा आहे की, आपण राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत आहात.
उत्तर-दक्षिण कॉरिडोर (जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत), पूर्व-पश्चिम कॉरिडोर (पोरबंदर ते आसाममधील सिलचर पर्यंत) आणि भारताच्या मेट्रो शहरांना जोडणारा स्वर्णिम चतुर्भुज हा राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या महामार्गांची देखभाल करतो.
जर आपल्याला रस्त्याच्या कडेला हिरव्या रंगाचे मालाचे दगड दिसले तर, याचा अर्थ असा की, आपण राज्य महामार्गावर प्रवास करत आहात. असे महामार्ग तयार करणे व देखभाल करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. भारत सरकारच्या नोंदीनुसार राज्य सरकार महामार्ग त्या राज्यातील शहरे एकमेकांना जोडतात. 2015-2016 च्या नोंदीनुसार, सध्या देशातील राज्य महामार्गांची एकूण लांबी 1.76 लाख किमी आहे.
जर आपल्याला निळ्या, काळ्या किंबा पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड दिसला, तर याचा अर्थ असा आहे की, आपण शहरात प्रवास करत आहात किंवा जिल्ह्याच्या रस्त्यावरून जात आहात. जिल्हा रस्ता शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांना जोडतो. सध्या जिल्हा रस्ता सुमारे 5.62 लाख किमी आहे.
जर आपल्याला रस्त्यावर केशरी रंगाचा मैलाचा दगड दिसला, तर याचा अर्थ असा आहे की, आपण एका खेड्यातील रस्त्यावरून जात आहात. सध्या ग्रामीण रस्त्यांची एकूण लांबी 3.93 लाख किमी आहे. नारंगी मैलाचे दगड प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेचे प्रतिनिधित्व करतात.
ब्रिटिशांनी शून्य मैलाचे दगड वापरले आणि सर्व शहरांमधील अंतर मोजण्यासाठी हा केंद्रबिंदू होते. ब्रिटिश काळात नागपूर हे शून्य मैलांचे केंद्र होते आणि ते भारताचे भौगोलिक केंद्र बनले होते. या टप्प्यावर चार घोडे व एक आधारस्तंभ आहे, ज्यावर रस्त्याद्वारे देशातील प्रमुख शहरादरम्यानच्या अंतराविषयी संपूर्ण यादी आणि माहिती होती.
(Red, blue, white, orange, green Know the meaning of milestone colour)
आपल्याला पडलेली 90 टक्के स्वप्न आपण का विसरतो? जाणून घ्या कारण…
तंदुरुस्त राहण्यासाठी अति पाण्याचे सेवन ठरु शकते घातक, होऊ शकतात या गंभीर समस्या