Republic Day 2022 : भारतामध्ये दरवर्षी प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्याला स्वांतत्र जरी 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं असलं तरी देखील 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान (Constitution) स्वीकारलं. संविधानामुळे जनता (Public) हीच देशातील सर्वात शक्तीशाली घटक बनली. त्यामुळे आपन दरवर्षी प्राजासत्ताक दिन साजरा करत असतो. संविधानाच्या पहिल्या बैठकीला 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. या बैठकीमध्ये 210 सदस्यांची उपस्थिती होती. याच बैठकीमध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांची एकमताने स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, ते शेवटपर्यंत या पदावर राहिले.13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विधानसभेत संविधानाचे उद्दिष्ट मांडले, जे 22 जानेवारी 1947 रोजी पारित झाले. त्याचे मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
1. भारत एक पूर्ण सार्वभौम प्रजासत्ताक असेल, जे स्वतःचे संविधान तयार करेल.
2. भारताच्या संघराज्यात असे सर्व प्रदेश समाविष्ट केले जातील जे सध्या ब्रिटीश भारतातील किंवा संस्थानांमध्ये आहेत किंवा दोन्ही बाहेर आहेत, असे प्रदेश जे भारताच्या सार्वभौम संघात सामील होऊ इच्छितात.
3. भारतीय संघराज्यात सर्व राजकीय शक्तींचा मुळ स्त्रोत ही जनताच असेल.
4. भारतातील नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, पद, संधी आणि कायद्याची समानता, विचार, भाषण, श्रद्धा, व्यवसाय, संघटना आणि कृती यांचे स्वातंत्र्य, कायदा आणि सार्वजनिक नैतिकतेच्या अधीन राहून मिळेल.
5. अल्पसंख्याक, मागास जाती आणि आदिवासी जातींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाईल.
6. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामी नंतर भारतीय राष्ट्रध्वज फडकवून भारतीय प्रजासत्ताकची ऐतिहासिक घोषणा केली. इंग्रजांच्या राजवटीतून सुटका झाल्यानंतर 894 दिवसांनी संविधान लागू झाले.
तेव्हापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात अभिमानाने आणि आनंदाने साजरा केला जातो.
पावसात धावल्यानंतर जास्त भिजतो की एका जागी उभे राहिल्यावर, उत्तर आहे खूप रंजक..