मुघलांना, इंग्रजांना दिले होते पैसे उधार! हे आहेत भारतीय इतिहासातील सर्वात मोठे उद्योगपती

| Updated on: Jun 24, 2023 | 1:03 PM

हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांनी आधीच्या काळात श्रीमंतांनाच काय तर मुघलांनाही कर्ज दिले होते. यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावता येतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माशी संबंधित आहेत. त्यांचा उल्लेख मुस्लीम आणि हिंदू किंवा जैन असा करण्यात आला आहे.

मुघलांना, इंग्रजांना दिले होते पैसे उधार! हे आहेत भारतीय इतिहासातील सर्वात मोठे उद्योगपती
virji vohra richest man in history
Follow us on

मुंबई: सध्या देशात आणि जगात एकापेक्षा एक उद्योगपती आहेत. भारतात सुद्धा मोठे मोठे उद्योगपती आहेत. पण तुम्हाला माहित आहे का भारतीय इतिहासातील सर्वात मोठा उद्योगपती म्हणून कोण आहेत? वीरजी व्होरा असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. गुजरातमधील सुरत येथील रहिवासी असलेले विरजी व्होरा हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांनी आधीच्या काळात श्रीमंतांनाच काय तर मुघलांनाही कर्ज दिले होते. यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावता येतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्यांचे वर्णन आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून केले गेले आहे. 16व्या शतकात त्यांची संपत्ती सुमारे 80 लाख डॉलर्स होती, असे म्हटले जाते. वीरजी व्होरा हे इंग्रजांमध्ये मर्चेंट प्रिंस (व्यापारी राजकुमार) म्हणून ओळखले जात होते. गुजरातमधील सुरत इथले रहिवासी वीरजी व्होरा यांनी 25 ऑगस्ट 1619 रोजी इंग्रजांना 25000 महमूदी उधार दिल्या होत्या. यानंतर 1630 मध्ये त्यांनी आग्र्याच्या इंग्रजांना 50000 रुपये उधार दिले.

इतकंच नाही तर नोंदीनुसार 1635 मध्ये त्यांनी इंग्रजांना 20000 रुपये उधार दिले होते. त्यानंतर 1636 मध्ये त्याने दोन लाख रुपये उधार दिले. ईस्ट इंडिया कंपनीला कर्जाची गरज असताना ती वीरजी व्होरा यांच्याकडे गेली. वीरजी व्होरा हे होलसेल विक्रेते होते. ते अनेक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात व्यापार करायचे. सुरत मधून ते मसाले, सराफा, प्रवाळ, हस्तिदंत, शिसे, अफू आदी वस्तूंची ते देशभर निर्यात करायचे. त्यांच्याबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध होती ती म्हणजे जगातल्या कोणत्या बाजारात काय विकता येईल हे त्यांना माहित होतं.

इ.स. 1590 मध्ये जन्मलेल्या वीरजींच्या वंशाविषयी किंवा घराण्याविषयी फारशी माहिती नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माशी संबंधित आहेत. त्यांचा उल्लेख मुस्लीम आणि हिंदू किंवा जैन असा करण्यात आला आहे. याशिवाय परदेशी व्यापारीच नव्हे तर वीरजी व्होरा यांचेही त्या वेळच्या मुघल राज्यकर्त्यांशी खूप चांगले संबंध होते.