अनेक वेबसाइट जुन्या नोट आणि सिक्के (Old Coins) यांची खरेदी-विक्री करण्याची सुविधा देत असतात. जुन्या वस्तूंचे कलेक्शन करणे अनेकांना आवडत असते तसेच अनेक असे सिक्केप्रेमी सुद्धा असतात ज्यांना जुन्या नोट आणि जुने सिक्के (Rare Currency Notes) जमा करून ठेवण्याचा छंद असतो. त्यामध्ये अशा लोकांचा सुद्धा समावेश आहे ज्यात शुभ-अशुभ, एखादा संयोग, एखादा नंबर याच्यावर विश्वास असतो. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक अशा प्रकारचे कलेक्शन आपल्याकडे करून ठेवतात जेणेकरून त्यामागे त्यांची श्रद्धा असते की अशा प्रकारची नोट जर आपण आपल्याकडे ठेवली तर आपण लवकरच श्रीमंत व मालामाल होऊ, अशी एक भाबडी श्रद्धा सुद्धा असते आणि म्हणूनच अनेक जण जुने सिक्के जुन्या नोटा सांभाळून ठेवत असतात. आपण जाणून घेत आहोत 786 नंबर असणाऱ्या 2 रुपयाच्या नोट (Two Rupee Rare Note) बद्दल. जर तुमच्याकडे सुद्धा या नंबरची नोट असेल तर लवकरच तुम्ही श्रीमंत व्हाल. मालामाल होण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. घरबसल्या फक्त 2 रुपयाच्या नोटेमुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकतात.
तसे पाहायला गेले तर अनेक जण जुने सिक्के आणि जुन्या नोटांचे कलेक्शन करत असतात. जुन्या वस्तू सांभाळून ठेवणे अनेकांचा छंद असतो आणि हाच छंद जर तुम्हाला सुद्धा असेल तर तुम्हाला या छंदाच्या माध्यमातून भविष्यात खूप सारी कमाई करता येऊ शकते. सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारचे छंद बाळगणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी नाही. तुमचा छंद तुम्हाला भविष्यात करोडपती बनवू शकतो. अनेक वेबसाइट या जुन्या नोटा आणि सिक्के यांची खरेदी विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देत असतात. खरे तर गेल्या अनेक महिन्यांपासून जुन्या नोटा आणि जुने सिक्के यांची खरेदी-विक्री करण्याचा ट्रेंड बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. जर तुमच्याकडे सुद्धा जुनी एखादी नोट असेल तर अशा वेळी या नोटेच्या सहाय्याने तुम्ही सहजच पैसा कमवू शकता. आजच्या लेखामध्ये आम्ही दोन रुपयाच्या जुन्या नोटांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
जर दोन रुपयाच्या या विशेष नोटे बद्दल जाणून घ्यायचं असेल तर सर्वात आधी या नोटेवर 786 क्रमांक लिहिलेला असायला हवा. 786 नोट पाहताच अनेक लोक मोठी मोठी बोली लावत असतात. कारण की 786 नंबर इस्लाम धर्मामध्ये शुभ मानला जातो आणि म्हणूनच अनेक लोक या प्रकारची नोट विकत घेण्यासाठी लाखो रुपये सुद्धा खर्च करतात.
दुसरी विशेष गोष्ट म्हणजे ही नोट गुलाबी असायला हवी आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे या नोटेवर आरबीआयचे(RBI) पूर्व गव्हर्नर मनमोहन सिंग यांची सही असायला हवी. या दोन रुपयाच्या नोटेला तुम्ही ऑनलाईन होत असलेल्या ऑक्शन मध्ये सहज विकू शकता. जर तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा अशा प्रकारची एखादी नोट असेल तर तिला बाहेर काढा आणि या कलेक्शनमध्ये विकण्याचा प्रयत्न करा असे केल्याने तुम्हाला भरपूर पैसा कमवता येऊ शकतो.
अशा प्रकारची नोट विकण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसल्या सुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या ईबे (Ebay) आणि क्लिक इंडिया (Click India) सारख्या साइट्सच्या माध्यमातून ही नोट विकू शकता. या दोन वेबसाइटवर तुम्ही जुने नोट व्हाट्सअप च्या माध्यमातून विकू शकता.
– Ebay च्या वेबसाइट वर या दुर्लभ नोटेला खरेदीदार मोठी रक्कम देत आहेत.
– सर्वात आधी तुम्हाला Ebay वर एक सेलर म्हणून स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
– आपले डिटेल्स भरून तुम्हाला तुमचे युजर अकाउंट क्रिएट करायचे आहे.
– यानंतर संबंधित नोटेचे दोन्ही साईड वरील फोटो क्लिक करून अपलोड करायचा आहे.
– यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी माहिती समाविष्ट करा.
– वेबसाइट वर तुम्ही दिलेली माहिती एकदा तपासून पहा
– आता येथे तुमची डील दिसू लागेल, ज्यांना विकत घ्यायचे आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील.
जुने सिक्के आणि नोटा यांची खरेदी-विक्री करण्यासाठी quickr, indiancoinmill, Indiamart आणि CoinBazar सारख्या अनेक वेबसाइट्स ऑनलाइन प्लॅटफार्म उपलब्ध करून देतात. या वेबसाइट्स वर तुम्हाला आपला मोबाइल नंबर, नाव, ई-मेल इत्यादी माहिती टाकून रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला सिक्क्याचा फोटो आणि त्याचे डिटेल टाकायचे आहे त्यानंतर ज्या व्यक्तीला खरेदी करायचे असेल तर व्यक्ती तुमच्याशी व्यक्तिगत पातळीवर संपर्क साधेल व तुम्ही जी किंमत सांगितली आहे त्या किंमती प्रमाणे तुम्हाला पैसे देऊ शकते.
टिप्स : ही स्टोरी वेगवेगळ्या वेबसाइटवरून आणि ई कॉमर्स साइट वर दिलेल्या माहितीच्या आधारावर सांगण्यात आलेली आहे टीव्ही 9 तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्याचा सल्ला अजिबात देत नाही, म्हणून अशा प्रकारच्या कोणत्याही खरेदी-विक्री पासून सावधानता बाळगा.
कोल्डड्रिंक, सोडा बॉटलच्या खालील भाग सपाट का नसतो? जाणून घ्या इंटरेस्टिंग कारण!
घराघरातल्या बायका, पोरींना ज्या गाण्यानं देशभर वेड लावलं ते कच्चा बादामची गोष्ट तुम्हाला माहितीय?