ट्रकच्या मागे लोखंडी साखळी का लोंबकळत असते? माहीत्ये का ?

| Updated on: Nov 15, 2024 | 3:37 PM

ट्रकच्या मागे लटकणारी लोखंडी साखळी स्थिर विद्युत निर्सरणासाठी वापरली जाते. ट्रक चालताना रस्ता आणि ट्रक यांच्यातील घर्षणामुळे स्थिर विद्युत निर्माण होते. ही विद्युत ज्वलनशील पदार्थांना आग लावू शकते. साखळी जमिनीला स्पर्श करून हे विद्युत जमिनीत पाठवते आणि ट्रकची सुरक्षा सुनिश्चित करते. साखळी सोपी, स्वस्त आणि प्रभावी असल्याने तिचा वापर केला जातो. इतर चांगले विद्युत वाहक धातूंचाही वापर करता येतो.

ट्रकच्या मागे लोखंडी साखळी का लोंबकळत असते? माहीत्ये का ?
ट्रकच्या मागे लोखंडी साखळी का लोंबकळत असते?
Image Credit source: social media
Follow us on

रस्त्यावरून धावणारी वाहने आपण रोज पाहत असता. या वाहनांच्या मागे काही ना काही लिहिलेलं असतं. टाटा, ओके, किंवा शेरोशायरी ही वाहनांच्या मागे लिहिलेली असतेच. मग ते कोणतंही वाहन असो. ट्रकच्या मागे तर नेहमी काही ना काही लिहिलेलं असतं. पण ट्रकच्या बाबतचं आणखी एक निरीक्षण आहे. या ट्रकच्या मागे वेगवेगळ्या प्रकारची नक्षीदार चित्र असतात. डिझाईन केलेलं असतं. सामान ठेवण्याच्या हिशोबाने हे डिझाईन केलेलं असतं. त्यामुळे हे ट्रक पाहिल्यावर वेगळंच वाटतं. पण तुम्ही एक गोष्ट मार्क केली का? ट्रकच्या मागे एक साखळी नेहमी लोंबकळत असते? ती का? काय कारण असतं? याचीच आज तुम्हाला आम्ही माहिती देणार आहोत.

ट्रकच्या मागे लोखंडी साखळी लटकवण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही लोखंडाची साखळी नेहमी ट्रेनमध्ये पाहिली असेल. तिच्या मागे एक गोल टँक असतो. तसाच ट्रकच्या मागेही एक गोल टँक असतो. त्यात पेट्रोल, केरोसिन आणि गॅससारखे ज्वलनशील पदार्थ असतात.

जेव्हा ट्रक रस्त्यावरून धावतो तेव्हा ट्रक आणि रस्त्याच्यामध्ये एक फ्रिक्शन होतं. त्यामुळे स्थिर विद्यूत प्रवाह निर्माण होतो. या स्थिर विद्यूत प्रवाहामुळे ट्रकला आग लागण्याची शक्यता असते. ते चार्ज उत्पन्न होऊ नये, घर्षण होऊ नये म्हणून ट्रकच्या पाठी साखळी लावलेली असते.

साखळीमुळे हे काम होतं

ट्रकला आग लागण्याची अधिक भीती असते. कारण ट्रकला गोल टँक लावलेले असतात. त्यात ज्वलनशील पदार्थ असतात. या धोक्यापासून वाचण्यासाठी ट्रकच्या पाठी लोखंडी साखळदंड किंवा साखळी लावलेली असते. साखळी लावल्याने ती जमिनीला वारंवार टच होते. साखळी जमिनीला टच झाल्याने उत्पन्न होणारा चार्ज (प्रवाह) साखळीच्या माध्यमातून जमिनीत जातो. ट्रक आणि रस्त्याच्या फ्रिक्शन्समधून होणारा प्रवाह साखळी जमिनीकडे पाठवते. त्यामुळे ट्रकला आग लागण्याचा धोका कमी होतो.

 धातूचाही वापर करू शकता

त्यामुळेच ट्रकच्या मागे साखळी लावलेली असते. ट्रक सुरक्षित राहावा हा त्यामागचा हेतू असतो. पण ट्रकच्यामागे साखळीच लावली पाहिजे असं नाही. आर्थिंग जमिनीत घालवण्यासाठी जे चांगला विद्यूत प्रवाह वहन करू शकतात अशा धातूंनाही ट्रकच्या मागे लावू शकता. ट्रकच्या मागे साखळी अधिक प्रमाणात लावण्याचं कारण म्हणजे साखळी सहज आणि कुठेही मिळते. शिवाय स्वस्तही असते.